श्रीगोंदा : क्रांतीसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील आरोपीवर कडक कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास आत्मदहन करू असा इशारा संघटनेच्यावतीने निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, क्रांतीसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश कुरुमकर यांच्यावर 25 फेब्रुवारी रोजी लक्ष्मण वांगणे, गणेश गिरमकर, काका गिरमकर या तिघांनी फॉच्युनर गाडी क्रं. एम.एच. 16 सी .एच.9059 गाडीतून येऊन प्राणघातक हल्ला केला होता. तसेच, त्यांच्या जवळील रोख रक्कम पाच हजार रुपये, गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चैन चोरून नेली. या तिघांवर 392 अन्वये गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी. अन्यथा दि. 26 मार्च रोजी श्रीगोंदा पोलीस स्टेशन समोर आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दरेकर, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश कुरुमकर, तालुका संपर्क प्रमुख संदिप डेबरे यांनी दिला आहे.
0 टिप्पण्या