कर्जमाफीच्या याद्या मराठीत लावा-क्रांतिसेना

 उस्मानाबाद/कळंब : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांच्या नावाची यादी सर्व बँके समोरील नोटीस बोर्डा वरती मराठी भाषेत लावण्यात यावी अशी मागणी क्रांतीसेनेच्या वतीने तहसीलदार यांना करण्यात आली आहे.
      छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत राज्य शासनाने कर्जमाफी दिलेल्या शेतकरी बांधवांच्या याद्या सर्वच बँके समोर इंग्रजी भाषेत लावण्यात याल्या आहेत कर्जमाफी योजने अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांचे नावे इंग्रजीत असल्याने खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांना त्यांचे नाव शोधने खूप कठीण जात आहे. इंग्रजी वाचता येत नसल्याने जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी राज्यांला आपले नाव शोधन्यासाठी दलालांचे किंवा उच्चशिक्षितांचे पाये धरावे लागत आहेत जर जगाच्या पोशिंद्याचेच असे हाल होत असतील तर उद्याच्या भारत देशाचे भविष्य काय असेल. माननीय साहेब जगाचा पोशिंदा शेतकरी राजाच आहे त्यांच्या मुळेच आपन आरामात खुर्चीवरती बसून खात पेत आहोत हे लक्षात घेऊन तात्काळ सर्व बँकांना शेतकरी बांधवांच्या कर्जमाफी च्या याद्या मराठीत लावण्याचे आदेश द्यावेत अन्यथा क्रांतीसेना शेतकरी बांधवांना शोबत घेऊन सर्वच बँके समोर क्रांतीकारी आंदोलन करील असे निवेदनात म्हटले आहे.
      निवेदनावर तालुका अध्यक्ष अमोल आण्णा शेळके , मराठवाडा सरचिटणीस मोहन सोनटक्के,पृथ्वीराज देशमुख, अमर तापडिया,अजय पालवे, गजानन फाटक, लहुराज अष्टेकर, नरसिंग शेळके, विशाल आगवन, राहुल होसलेमल व शेतकरी बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या