श्रीगोंदा प्रतिनिधी : हिरडगाव येथील क्रांतिसेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष पंढरीनाथ दरेकर यांना मोबाईल वरुन खुनाच्या धमक्या येत होत्या म्हणून त्यांनी श्रीगोन्दा पोलीस ठाण्याला तक्रार दिली. धमक्या देणाऱ्या समोरच्या पार्टीशी तड़जोड करून जांभळे यांनी सुभाष दरेकर यांनाच अटक करण्याची धमकी दिली आणि पांच हजार रूपयांची मागणी केली.ज्यांना खुनाच्या धमक्या येतात, त्यांनाच पैसे मागण्याची व अन्याय करण्याची ही पोलिसांची पध्दत कोणती ? अखेर तीन हजार रुपये जांभळे यांना देण्याचे ठरले व लाच लुचपत प्रतिबंधक पथका समोरच जांभळे यांनी निर्लज्जपणे पैशाची लाच स्वीकारली.
अन्याय करणारा आणि अन्याय सहन करणारा दोघांशी अर्थपूर्ण तड़जोड करून पोलीस उपनिरीक्षक गणेश जांभळे यांनी ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्यावरच अन्याय करण्याचे काम केले, म्हणून त्यांच्यावर ही पाळी आली. वरिष्ठानी अशी प्रकरणे समजून घेऊन चुकीचे वागणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहि‘सदरक्षणाय, खलनिग्रहणाय जेअसे ब्रीद पोलिसांच्या खाकी वर्दीवर लावलेले आहे. याचा अर्थ सामान्य जनतेला सुरक्षित ठेऊन ‘खल’वृत्तीने वागणाऱ्यांना ठेचण्याचे काम पोलिसांनी करणे अपेक्षित आहे; परंतु गेल्या काही वर्षांत पोलिसांना या ब्रीद वाक्याचा विसर पडलेला दिसतो.आर्थिक तड़जोडी करून खल वृतीला पाठीशी घालण्याचे काम अनेक वेळा पोलिस करीत आहेत.
-----०००० -------
0 टिप्पण्या