कर्जत : एफ एम डी लसीकरणास विलंब केलेल्या दोषींवर कारवाई करण्याची मागणी क्रांतिसेनेने आज कर्जत तहसिल चे मनोज भोसेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली .
दर वर्षी एफ एम डी रोग प्रतिबंधक लस जनावरांना दिली जाते. परंतु चालू वर्ष उलटूनही जनावरांना लसीकरण करण्यात आलेले नाही. आता पर्यंत या लसीचे सहा वेळा निवेदा काढण्यात आल्या परंतु काही ना काही कारण करून या निवेदा फेटाळण्यात आल्या.एकीकडे गाई ला गोमाता म्हणा म्हणुन बळजबरी केली जाते आणि दुसरीकडे याचं मुक्या प्राण्यांना लसी साठी तरसावले जाते. जाणून बुजून लसीकरण करण्यासाठी या वर्षी विलंब करण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्र मधील बरेच जनावरे दगावले आहेत. यामुळे लसीकरणास विलंब करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी व या लसी चा पुरवठा करण्यात यावा असे क्रांतिसेनेने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
क्रांतिसेनेने जनावरें सोबत घेऊन कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा ईशारा या निवेदनात दिला आहे.यावेळी क्रांतिसेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दरेकर, कर्जत तालुका अध्यक्ष शब्बीर शेख ,उपाध्यक्ष गोकुळ नेटके, कार्याध्यक्ष कृष्णा धांडे,संपर्क प्रमुख साजन शेख ,प्रवीण तनपुरे आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या