लसीकरणास विलंब करणाऱ्यावर कारवाई करण्याची क्रांतिसेनेची मागणी

श्रीगोंदा :  एफ एम लसीकरणास विलंब केलेल्या दोषींवर कारवाई करण्याची मागणी क्रांतिसेनेने आज श्रीगोंदा तहसीलदार महेंद्र माळी व श्रीगोंदा पंचायत समिती बीडीओ शिरसाट यांच्याकडे केली .
       दर वर्षी एफ एम डी ही रोग प्रतिबंधक लस जनावरांना दिली जाते. परंतु चालू वर्ष उलटूनही जनावरांना लसीकरण करण्यात आलेले नाही. आता पर्यंत या लसीचे सहा वेळा निवेदा काढण्यात आल्या परंतु काही ना काही कारण करून या निवेदा फेटाळण्यात आल्या.एकीकडे गाई ला गोमाता म्हणा म्हणुन बळजबरी केली जाते आणि दुसरीकडे याचं मुक्या प्राण्यांना लसीकरणा साठी तरसावले जाते. जाणून बुजून लसीकरण करण्यासाठी या वर्षी विलंब करण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्र मधील बरेच जनावरे दगावले आहेत. यातून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे लसीकरणास विलंब करणाऱ्या दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी व या लसी चा पुरवठा करण्यात यावा असे क्रांतिसेनेने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
       क्रांतिसेनेने जनावरें सोबत घेऊन कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा ईशारा या निवेदनात दिला आहे.यावेळी क्रांतिसेनेचे दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष अविनाश कुरूमकर ,जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दरेकर, तालुका अध्यक्ष वैभव जाधव, तालुका संपर्क प्रमुख संदीप डेबरे, तालुका कार्याध्यक्ष अमित जाधव,ज्ञानेश्वर दरेकर आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या