कर्जत तालुक्यातील २८४ शेतकऱ्यांचे राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत शेत तळ्याचे अनुदान प्रलंबित असल्याने ते लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात जमा करण्यात यावे, यासाठी आज क्रांतीसेनेच्या वतीने कर्जत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांनी शेततळे बांधले पण शेतकऱ्यांना या शेततळ्याचे अनुदान मात्र अजून मिळालेले नाही, हे अनुदान लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे , अन्यथा क्रांतीसेना शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन हाती घेईल. या आंदोलनामुळे होणाऱ्या नुकसानीस शासन जबाबदार राहील, असे या निवेदनात म्हटले आहे.
या मागणीचे निवेदन देताना क्रांतीसेना अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दरेकर,शेतकरी आघाडीचे कर्जत तालुकाप्रमुख शब्बीर शेख, तालुका उपाध्यक्ष गोकुळ नेटके , कार्याध्यक्ष कृष्णा धांडे , संपर्क प्रमुख साजन शेख व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
0 टिप्पण्या