राहुरी/ प्रतिनिधी : तालुक्यातील केंदळ येथील विरभद्र माध्यमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून क्रांतीसेनेने आयोजित केलेल्या राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले जन्मोत्सव निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.
दि. ३ जानेवारी व १२ जानेवारी २०१८ रोजी विद्यालयात जिजाऊ व सावित्रीबाई फुले जन्मोत्सव निमित्त निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत विद्यालयातील ७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र तसेच प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक व रोख स्वरूपात रक्कम व ट्रॉफी देण्यात आल्या. यावेळी गोरक्षनाथ तारडे , अरुण डोंगरे, जगन्नाथ भुसे , आण्णासाहेब देवरे,प्रल्हाद देवरे , शिवाजी भोसले, शेळके सर , शिरसाठ सर, हिवाळे सर, तांबोळी सर, कानडे सर, झिने सर,रोहकले सर ,गाढे मॅडम ,तिजोरे मॅडम व विद्यालयातील प्राध्यापकांच्या हस्ते प्रशस्तीपत्र तसेच ट्रॉफी देऊन स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी क्रांतीसेनेचे युवक जिल्हा सरचिटणीस गितेश देवरे, राहुरी विद्यार्थी तालुका अध्यक्ष कृष्णा तारडे, सचिन बोरकर, निलेश भुसे, कृष्णा भोसले ,राजु कैतके ,श्रीराम बोरकर, शुभम कराळे ,राजेंद्र तारडे , बाळासाहेब चव्हाण, बाळासाहेब तारडे , रावसाहेब तारडे, संभाजी भोसले, भिमराज बोरकर, संदीप भोसले, अंकुश तारडे , चंद्रकांत लोंढे , महेंद्र तारडे , साईनाथ तारडे, नवनाथ भोसले, नवनाथ औटी आदींनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या