राहुरी : राजमाता जिजाऊ जयंती क्रांतीसेनेच्या वतीने राहुरी येथे साजरी करण्यात आली. तसेच पत्रकार दिनानिमित्त राहुरी तालुक्यातील पत्रकार बंधूंचा सत्कार करण्यात आला.यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र वाडेकर व निसारभाई सय्यद यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी निसारभाई सय्यद, राजेंद्र वाडेकर, भाऊसाहेब येवले आदींनी मार्गदर्शन केले.
    या कार्यक्रमास राजेंद्र वाडेकर,निसारभाई सय्यद, भाऊसाहेब येवले, मुख्तारभाई सय्यद,हेमंत मिसाळ,सुनिल भुजाडी, विनीत धसाळ,बंडूभाऊ म्हसे , रियाजभाई देशमुख, अनिल कोळसे,मनोज साळवे , आर.आर.जाधव, विजय येवले, सुहास जाधव ,बंटी तारडे, राजेंद्र पवार, शरद पाचर्णे आदी पत्रकार उपस्थित होते. या वेळी क्रांतीसेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष संदीप ओहोळ , जिल्हाध्यक्ष जालिंदर शेडगे,प्रशांत तनपुरे, युवक जिल्हा उपाध्यक्ष शेखर पवार, युवक तालुका अध्यक्ष सचिन शिरसाठ, सोमेश्वर भुजाडी, नितीन जंगले,अशोक गडधे,रवींद्र गाडेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.