राहुरी / प्रतिनिधी : क्रांतीसेनेने आयोजित केलेल्या जिजाऊ सावित्री जन्मोत्सव सोहळ्यात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती केंदळ येथील विद्यालयात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमात विद्यालयात जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या चरित्रात्मक निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदविला आहे.या स्पर्धेत विद्यालयातील ७३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र तसेच प्रथम , द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात येणार आहे. या कार्यक्रमास क्रांतीसेनेचे युवक जिल्हा सरचिटणीस गितेश देवरे,राहुरी विद्यार्थी तालुका अध्यक्ष कृष्णा तारडे,शेळके सर ,शिरसाठ सर , हिवाळे सर ,तांबोळी सर ,कानडे सर ,अप्पा पुगडवाले, सचिन बोरकर, निलेश भुसे, श्रीराम बोरकर व विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या