क्रांतीसेनेच्या संपर्क प्रमुख पदी मधुकर म्हसे, शिक्षक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदी भागचंद औताडे

पुणे/प्रतिनिधी : हडपसर, पुणे येथे क्रांतीसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रांतीसेनेचे प्रदेश अध्यक्ष संतोष तांबे हे होते तर प्रदेश सरचिटणीस नितीनभैय्या देशमुख, प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रतापसिंह पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष सुभाष चाटे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भागचंद औताडे, प्रदेश सरचिटणीस शहाजी कोळपे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केली होती.
      यावेळी मधुकर म्हसे यांचा संपर्क प्रमुख पदाचा कार्यकाळ संपला असल्याने त्यांनी क्रांतीसेनेच्या संघटन वाढीसाठी, शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना दुसर्‍यांदा क्रांतीसेनेच्या संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली, तर क्रांतीसेना शिक्षक आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदी मुख्याध्यापक महामंडळाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भागचंद औताडे सर यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी महाराष्ट्रातील विविध जिल्हातील कार्यकर्त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र क्रांतीसेनेचे प्रदेश अध्यक्ष संतोष तांबे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी नितीनभैय्या देशमुख, मधुकर म्हसे, भागचंद औताडे, प्रतापसिंह पाटील, सुभाष चाटे, कृष्णा घुले, कृष्णा सावंत, दीपस्तंभचे सुरज पोळ, दादासाहेब नाबदे आदींची भाषणे झाली. या बैठकीत शेतकरी, कामगार, युवक ,विद्यार्थी यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. प्रास्ताविक सचिन माथेफोड यांनी केले. सर्व राज्य पदाधिकाऱ्यांचा सत्कार पुणे जिल्हा अध्यक्ष संदीप आतकिरे यांनी केला, आभार प्रदर्शन पुणे जिल्हा उपाध्यक्ष सचिन सुंबे यांनी केले.
     या बैठकीला राज्य कार्यकारिणी सदस्य अरुण थोरात,पश्चिम महाराष्ट्र संघटक साईनाथ घोरपडे, पुणे प्रसिद्धी प्रमुख तुकाराम गोडसे,पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख महेश शिंदे,पुणे विभाग प्रमुख जगताप, मार्गदर्शक नवनाथ वाघ,बाजीराव गागरे, मराठवाडा अध्यक्ष रघुनाथ भोसले,कृष्णा सावंत, परभणी जिल्हा अध्यक्ष परमेश्वर यादव, अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष आविनाश कुरूमकर,श्रीगोंदा तालुका अध्यक्ष वैभव जाधव, कर्जत तालुकाप्रमुख शब्बीर शेख,कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष अभिनंदन चौगुले,औरंगाबाद जिल्हा संपर्कप्रमुख साईनाथ कासोळे,दिपक गायकवाड, दिनेश दुधाट, औदुंबर देवडकर, राजु शेरे, मोहन सोनटक्के, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष आयुब शेख,सोलापूर जिल्हा सरचिटणीस गणेश पाटील, अहमदनगर युवक जिल्हा सरचिटणीस गितेश देवरे, राहुरी विद्यार्थी तालुका अध्यक्ष कृष्णा तारडे, सचिन बोरकर, विष्णूदास भोसले,संदीप मचे,संकेत कांबळे,चंद्रकांत दुंडे, झांबरे सर,नाशिक युवक तालुका अध्यक्ष राहुल महाजन, योगेश वडणे व क्रांतीसेनेचे व शेतकरी आघाडीचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या