श्रीरामपूर / प्रतिनिधी : माळेवाडीतील क्रांतीसेना अध्यक्ष अण्णासाहेब शेळके यांच्या विहिरीत पहाटे काळविट पडल्याचे ते शेतात गेले असता लक्षात आले,त्यांनी क्रांतीसेना तालुका अध्यक्ष अयुब शेख व मित्रांच्या मदतीने त्या काळवीटाला विहीरीच्या बाहेर काढले.विहीरीबाहेर काढल्यावर ते काळवीट उड्या मारत आंनदाने पळाले.यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष भागचंद औताडे यांनी वनक्षेत्रपाल यांना कळविले,त्यांनी वनपाल लांडे यांना पाठविले.तत्पुर्वी क्रांतीसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या काळवीटाला विहीरीच्या बाहेर काढले होते.
या वेळी क्रांतीसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दाखवलेल्या कार्याची माळेवाडी पंचक्रोशीतील नागरिकांनी कौतुक केले आहे.
0 टिप्पण्या