राहुरी/ प्रतिनिधी - गाडगेबाबा आश्रमशाळेतील मुलांना खिचडी व फळ वाटप करून क्रांतीसेना युवक जिल्हा सरचिटणीस गितेश देवरे यांनी वाढदिवस साजरा केला.
या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे गितेश देवरे यांचा पंचक्रोशीतील नागरिकांनी कौतुक केले आहे. या पद्धतीने सर्व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जर आपल्या वाढदिवसाला उपक्रम आयोजित केले तर अनाथ व आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या नागरिकांना नक्कीच या माध्यमातून आनंद मिळेल,या हेतूने क्रांतीसेनेचे युवक जिल्हा सरचिटणीस गितेश देवरे यांनी हा उपक्रम राबविला आहे , असे सांगितले.
या कार्यक्रमास राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे,क्रांतीसेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे,चर्मकार संघटनेचे अध्यक्ष संजय खामकर, क्रांतीसेनेचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष संदीप ओहोळ , जिल्हाध्यक्ष जालिंदर शेडगे, युवक जिल्हा उपाध्यक्ष शेखर पवार, विद्यार्थी संघटनेचे कृष्णा तारडे, सचिन बोरकर, निलेश भुसे,श्रीराम बोरकर, गाडगेबाबा आश्रमशाळेतील शिक्षक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या