गंगापूर /औरंगाबाद : गंगापूर तालुका अध्यक्ष पदी बाबासाहेब सुर्यवंशी यांना नियुक्ती पत्र क्रांतीसेनेचे प्रदेश सरचिटणीस नितीनभैय्या देशमुख यांच्या हस्ते देण्यात आले.
बाबासाहेब सुर्यवंशी यांनी क्रांतीसेनेसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना तालुका अध्यक्ष केल्याचे यावेळी नितीन देशमुख यांनी सांगितले. याप्रसंगी वाळुज महानगर अध्यक्ष दिनेश दुधाट , उपाध्यक्ष दिपक गायकवाड, युवा अध्यक्ष औदूंबर देवडकर व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या निवडीचे क्रांतीसेनेचे संस्थापिका शालिनीताई पाटील, प्रदेशाध्यक्ष संतोष तांबे, प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, प्रतापसिंह पाटील, सुभाष चाटे, शहाजीराजे कोळपे,रघुनाथ भोसले, औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष मनोहर निकम , साईनाथ कासोळे पा , बांधकाम संघटनेचे अध्यक्ष सुनिल कोल्हे, विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तायडे आदी अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या