शेतकर्‍यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळेपर्यंत संपुर्ण वीज बिल माफीसाठी क्रांतीसेना आक्रमक

सोलापूर / प्रतिनिधी :  वीज वितरण कंपनी कडुन चालु असलेली सक्तीची वीज बिल वसुली थांबवून , जोपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळत नाही तोपर्यंत संपुर्ण वीज बिल माफी करावी, या आशयाचे निवेदन आज क्रांतीसेनेच्या वतीने सोलापूरच्या प्रभारी जिल्हाधिकारी माळी मॅडम यांच्या कडे सादर करण्यात  आले.
     ४ ते ५ वर्षे दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे.या परिस्थितीत त्याला जीवन जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यात या वर्षी शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेती मालाला योग्य मोबदला मिळाला नाही,तसेच नोटबंदीच्या काळात देखील शेतकऱ्यांचे झालेले आर्थिक नुकसान यामुळे शेतकरी विजबिल भरण्यास अक्षम आहे. शासनाने योग्य हमिभाव व स्वामिनाथ आयोग लागु करुन शेतकरी सक्षम करावा आणि वाजवी दरात वीज उपलब्ध करुन द्यावी. तरच शेतकरी विजबिल भरु शकेल.
     जोपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना संपुर्ण वीज बिल माफी करावी. आपण मा.मुखमंत्री साहेबांकडे या आशयाची मागणी करुन शेतकऱ्यांचा छळ थांबवावा, तसेच वीज वितरण कंपनी ने ३० नोव्हेंबर पर्यंत विजबिल भरा, अन्यथा वीजपुरवठा खंडीत करु, असा धमकी वजा इशारा शेतकऱ्यांना दिलेला आहे , जर शेतकऱ्यांचे शेतीपंपाचे वीज पुरवठा खंडित केला तर नाईलाजाने क्रांतीसेनेला अंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागेल व यातुन होणार्‍या नुकसानीस वीज वितरण कंपनी व प्रशासन जबाबदार राहील,असा इशारा क्रांतीसेनेने दिला आहे.
   या मागणीचे निवेदन देताना क्रांतीसेना शेतकरी आघाडीचे प्रदेश सरचिटणीस शहाजी कोळपे,पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख महेश शिंदे,सोलापुर जिल्हाध्यक्ष दिपक पाटील,उपाध्यक्ष विनोद ताटे,सरचिटणीस गणेश पाटील,मोहोळ तालुका अध्यक्ष बचुटे,दक्षीणचे सुनिल देशमुख,सुनिल पाटील,कोळी,व शेकडो शेतकरी कार्यकर्ते यावेळी उपस्थीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या