बार्शी/प्रतिनिधी - शेतकऱ्यांना आरोग्य सेवा अल्प दरात मिळण्यासाठी राज्य विमा महामंडळाची स्थापना करण्यात यावी , अशा मागणीचे निवेदन क्रांती सेनेच्या वतीने आज बार्शी तहसीलदार ऋषीकेश शेळके साहेब यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले आहे की, ज्या प्रमाणे कामगारांसाठी कामगार राज्य विमा महामंडळाची ( Employees State Insurance Corporation ) स्थापना केली त्या प्रमाणे शेतकर्यांसाठी राज्य विमा महामंडळाची स्थापना महाराष्ट्र सरकारने करावी.कारण वारंवार पडणाऱ्या दुष्काळी परिस्थिती मुळे तसेच पीकमालाला योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती खालावलेली आहे.त्यामुळे शेतकरी त्याच्या व कुटुंबीयांच्या आरोग्यावर पुरेसा पैसा खर्च करू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अल्प दरात विमा संरक्षण शेतकऱ्यांच्या कुटुंबाला देण्यात यावे.
या मागणीचे बार्शी तहसीलदार यांना निवेदन देताना प्रदेश संघटक शहाजीराजे कोळपे, जिल्हा उपाध्यक्ष विनोद बप्पा ताटे,तालुका अध्यक्ष विकास माने,तालुका उपाध्यक्ष नेताजी खैरे, तालुका संघटक संदिप माळी व कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या