शेतकरी राज्य विमा महामंडळासाठी जिल्हा व तालुका प्रशासनास निवेदने

सोलापूर : शेतकऱ्यांना आरोग्य सेवा अल्प दरात मिळण्यासाठी राज्य विमा महामंडळाची स्थापना करण्यात यावी ,अशा मागणीचे निवेदन क्रांतीसेनेच्या शेतकरी आघाडीच्या वतीने आज सोलापूरचे निवासी जिल्हाधिकारी रेळेकर,मोहोळ तहसीलदार, दक्षिण सोलापूर चे तहसीलदार यांना देण्यात आले.

       या निवेदनात म्हटले आहे की, ज्या प्रमाणे कामगारांसाठी कामगार राज्य विमा महामंडळाची ( Employees State Insurance Corporation ) स्थापना केली आहे व या महामंडळाच्या माध्यमातून कामगारांना व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य सेवा दिली जाते, त्या प्रमाणे शेतकर्‍यांसाठी राज्य विमा महामंडळाची स्थापना करुन आर्थिक दृष्ट्या दुर्बल झालेल्या शेतकऱ्यांना आरोग्य सेवा अल्प दरात महाराष्ट्र सरकारने उपलब्ध करून द्यावी .कारण वारंवार पडणाऱ्या दुष्काळी परिस्थिती मुळे तसेच पीकमालाला योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे.त्यामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल झालेला शेतकरी त्याच्या व त्याच्या कुटुंबीयांच्या आरोग्यावर पुरेसा पैसा खर्च करू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अल्प दरात विमा संरक्षण देण्यात यावे.

     या मागणीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना क्रांतीसेना शेतकरी आघाडीचे प्रदेश सरचिटणीस शहाजी कोळपे ,पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख महेश शिंदे ,जिल्हा अध्यक्ष दिपक पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विनोद ताटे , संघटक प्रितम जगदाळे, सरचिटणीस गणेश पाटील, बाळ देशमुख, मोहोळ तालुका कार्याध्यक्ष सुभाष बचुटे ,दत्ता मिसाळ , मल्लु धुळखेडे व मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या