बार्शी /प्रतिनिधी : कव्हे गावचे माजी सरपंच नेताजी खैरे यांची क्रांतीसेना शेतकरी आघाडीच्या बार्शी तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. त्यांना निवडीचे पत्र क्रांतीसेनेचे प्रदेश संघटक शहाजी कोळपे यांनी दिले.
या निवडीनंतर संघटनेच्या माध्यमातून बार्शी तालुक्यातील खेडे गावातील शेतकऱ्यांचे संघटन करून शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणार असल्याचे यावेळी नेताजी खैरे यांनी सांगितले. या निवडीचे क्रांतीसेनेचे संस्थापिका शालिनीताई पाटील,प्रदेशाध्यक्ष संतोष तांबे,प्रदेश सरचिटणीस नितीनभैय्या देशमुख, प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रतापसिंह पाटील, मार्गदर्शक सुभाष चाटे,पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख महेश शिंदे,सोलापूर जिल्हा अध्यक्ष दिपक पाटील आदींनी अभिनंदन केले.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विनोद बप्पा ताटे, तालुका अध्यक्ष विकास माने, तालुका संघटक संदिप माळी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या