पुणे - शेतकऱ्यांना आरोग्य सेवा अल्प दरात मिळण्यासाठी राज्य विमा महामंडळाची स्थापना करण्यात यावी ,अशा मागणीचे निवेदन क्रांतीसेनेच्या शेतकरी आघाडीच्या वतीने आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि हवेली तहसीलदार यांना देण्यात आले.
या निवेदनात म्हटले की, ज्या प्रमाणे कामगारांसाठी कामगार राज्य विमा महामंडळाची ( Employees State Insurance Corporation ) स्थापना केली आहे व या महामंडळाच्या माध्यमातून कामगारांना व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य सेवा दिली जाते, त्या प्रमाणे शेतकर्यांसाठी राज्य विमा महामंडळाची स्थापना करुन आर्थिक दृष्ट्या दुर्बल झालेल्या शेतकऱ्यांना आरोग्य सेवा अल्प दरात मिळण्याची सुविधा महाराष्ट्र सरकारने उपलब्ध करून द्यावी .कारण वारंवार पडणाऱ्या दुष्काळी परिस्थिती मुळे तसेच पीकमालाला योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल झालेला शेतकरी त्याच्या व त्याच्या कुटुंबीयांच्या आरोग्यावर पुरेसा पैसा खर्च करू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अल्प दरात विमा संरक्षण देण्यात यावे.
या मागणीचे निवेदन देताना क्रांतीसेना शेतकरी आघाडीचे पुणे जिल्हा अध्यक्ष संदीप आतकिरे ,जिल्हा उपाध्यक्ष सचिन सुंबे ,जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब चौधरी व शिवसंग्रामचे हवेली अध्यक्ष अनिरुध्द मराठे उपस्थित होते .
0 टिप्पण्या