क्रांतीसेनेच्या गंगाखेड तालुका प्रवक्ते पदी शिंदे

गंगाखेड / प्रतिनिधी : परभणी जिल्ह्य़ातील गंगाखेड येथील मुक्तीराम शिंदे  यांची क्रांतीसेनेच्या गंगाखेड तालुका प्रवक्ते पदी नियुक्ती केल्याची माहिती तालुका अध्यक्ष विष्णुदास शिवाजीराव भोसले यांनी दिली.
       या निवडीनंतर मुक्तीराम शिंदे यांचा फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पालम तालुका संपर्क प्रमुख अंगदराव शिंदे व क्रांतीसेनेचे सदस्य उपस्थित होते.
       क्रांतीसेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष तांबे सर , प्रदेश सरचिटणीस नितीनभैय्या देशमुख, प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील,शेतकरी सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रतापसिंह पाटील, मार्गदर्शक सुभाष चाटे ,प्रदेश सरचिटणीस शहाजी कोळपे, मराठवाडा अध्यक्ष रघुनाथ भोसले , जिल्हा अध्यक्ष परमेश्वर यादव आदींनी मुक्तीराम शिंदे यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या