परभणी : परभणी येथील परमेश्वर यादव यांना जिल्हा अध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र क्रांतीसेनेचे मराठवाडा अध्यक्ष रघुनाथ भोसले यांच्या हस्ते देण्यात आले.
परमेश्वर यादव हे आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा अध्यक्ष होते. त्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांना घेवुन क्रांतीसेनेत प्रवेश केला आहे. परमेश्वर यादव यांनी नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत चांगले मताधिक्य मिळाले होते.या सर्व गोष्टींचा विचार करून रघुनाथ भोसले यांनी जिल्हा अध्यक्ष पदाची माळ परमेश्वर यादव यांच्या गळ्यात घातल्याचे यावेळी सांगितले. परमेश्वर यादव यांनी नियुक्ती पत्र स्वीकारल्यानंतर बोलताना सांगितले की, क्रांतीसेना वाढीसाठी प्रयत्न करणार आहे तसेच आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गातील लोकांचे प्रश्न क्रांतीसेनेच्या माध्यमातून सोडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
परमेश्वर यादव यांच्या निवडीचे क्रांती सेनेच्या संस्थापिका माजी महसूल मंत्री शालिनीताई पाटील, प्रदेशाध्यक्ष संतोष तांबे ,प्रदेश सरचिटणीस नितीनभैय्या देशमुख, प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील, शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रतापसिंह पाटील, मार्गदर्शक सुभाष चाटे , सरचिटणीस शहाजीराजे कोळपे ,विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष शुभम गिरी, सिध्देश्वर मरळ,विनोद हाके, दत्तराव यादव,अर्जुन जाधव,सुकदेवराव इक्कर,बाळासाहेब कदम, स्वातीताई काळे आदींनी केले आहे.
0 टिप्पण्या