सातारा/प्रतिनिधी : सातारा येथील कोडोली मधील ओम साई राम हॉटेल मध्ये क्रांतीसेना शेतकरी आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शेतकरी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष प्रतापसिंह पाटील व प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश सरचिटणीस शहाजी कोळपे , पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख महेश शिंदे होते.
प्रतापसिंह पाटील यांनी क्रांतीसेना व आघाडीच्या माध्यमातून आजपर्यंत केलेल्या अनेक कामाचा व कार्याचा उल्लेख आपल्या अध्यक्षीय भाषणात केला.क्रांतीसेना ही शेतकरी हितासाठी कार्यरत असुन क्रांतीसेनेच्या स्थापनेपासून शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व वीज बिल माफ करुन मोफत वीज मिळावी, शेती मालाला हमीभाव मिळावा यासाठी क्रांतीसेनेच्या संस्थापिका डाॅ. शालिनीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढा देत होती. यापुढेही तो लढा राहील, असे सांगितले. क्रांतीसेना शेतकरी आघाडीचे प्रदेश सरचिटणीस शहाजी कोळपे ,पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख महेश शिंदे यांनी क्रांतीसेनेच्या कार्य व ऊद्दिष्टे यांच्या विषयी माहिती देउन कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.सातारा जिल्हा अध्यक्ष राजेंद्र कदम यांनी क्रांतीसेनेने महाराष्ट्रभर उभारलेल्या शेतकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी राज्य विमा महामंडळाच्या स्थापनेच्या आंदोलनात खारीचा वाटा उचलुन जिल्हा व तालुका प्रशासनाला निवेदन देवुन मागणी करण्यात येणार असल्याचे व पुढील दिलेल्या आदेशानुसार जिल्हात आंदोलन हाती घेण्यात येईल, असे यावेळी सांगितले. या बैठकीत सातारा व सांगली जिल्ह्य़ातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तया करण्यात आल्या.नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना अध्यक्ष प्रतापसिंह पाटील, सरचिटणीस शहाजी कोळपे , पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख महेश शिंदे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी क्रांतिसेना शेतकरी आघाडीच्या सातारा जिल्हा कार्याध्यक्ष पदी संतोष वेंदे , जिल्हा संपर्कप्रमुख पदी नवनाथ धायगुडे, सांगली जिल्हा अध्यक्ष पदी अभिजीत राजाराम पाटील, सांगली जिल्हा संपर्कप्रमुख पदी हनुमंत तोडकर , खंडाळा तालुकाध्यक्ष पदी चेतन रगाडे , कार्याध्यक्ष पदी अक्षय लोखंडे , जावळा तालुकाध्यक्ष पदी संतोष सुर्वे, फलटण तालुका संघटक पदी आनंदा पिसाळ यांच्या नियुक्तया करण्यात आल्या. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा यावेळी फुलगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक राजेंद्र कदम तर आभार व्यक्त नवनाथ धायगुडे यांनी केले.
0 टिप्पण्या