क्रांतीसेनेची शेतकऱ्यांच्या आरोग्य सेवेसाठी राज्य विमा महामंडळ स्थापन करण्याची मागणी

हातकणंगले - शेतकऱ्यांना आरोग्य सेवा अल्प दरात मिळण्यासाठी राज्य विमा महामंडळाची स्थापना करण्यात यावी ,अशा मागणीचे निवेदन क्रांतीसेनेच्या शेतकरी आघाडीच्या वतीने आज हातकणंगले तहसीलदार यांना देण्यात आले.
      या निवेदनात म्हटले आहे की, ज्या प्रमाणे कामगारांसाठी कामगार राज्य विमा महामंडळाची ( Employees State Insurance Corporation ) स्थापना केली आहे व या महामंडळाच्या माध्यमातून कामगारांना व त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य सेवा दिली जाते, त्या प्रमाणे शेतकर्‍यांसाठी राज्य विमा महामंडळाची स्थापना करुन आर्थिक दृष्ट्या दुर्बल झालेल्या शेतकऱ्यांना आरोग्य सेवा अल्प दरात ही सुविधा महाराष्ट्र सरकारने उपलब्ध करून द््यावी .कारण वारंवार पडणाऱ्या दुष्काळी परिस्थिती मुळे तसेच पीकमालाला योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे.त्यामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल झालेला शेतकरी त्याच्या व त्याच्या कुटुंबीयांच्या आरोग्यावर पुरेसा पैसा खर्च करू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अल्प दरात विमा संरक्षण देण्यात यावे.
     या मागणीचे हातकणंगले तहसीलदार यांना निवेदन देताना क्रांतीसेना शेतकरी आघाडीचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष अभिनंदन चौगुले, मानसिंग पाटील, कलगोंडा चौगुले, चेतन पाटील, किरण सपकाळ, संजय पाटील आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या