साहित्य व संस्कृती

कवयित्री शांताताई शेळके यांना मिळालेला पुरस्कार प्रेरणादायी-डॉ. संजय शेळके

श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : पंढरपूर येथील सौ. शांताताई हनमंत शेळके यांना मिळालेला वाचन संस्कृती प्रतिष्ठानचा ‘ संत गोरा कुंभार :काव्यरत्न पुरस्कार ” त्यांना भावी जीवनात अधिक काव्य निर्मितीला प्रेरणादायी असल्याचे मत शेळके हॉस्पिटलचे नेत्रतज्ञ डॉ. संजय शेळके यांनी व्यक्त केले.

येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे संत गोरा कुंभार पुण्यतिथीनिमित्त आयोजित कविता लेखन स्पर्धेत प्रथम क्रमांक आणि साहित्य सेवेतील योगदानाबद्दल पंढरपूर येथील सौ.शांताताई हनमंत शेळके यांना शेळके सभागृहात डॉ.संजय शेळके यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य टी.ई.शेळके होते. प्रारंभी वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

याप्रसंगी डॉ.सौ.अर्चना संजय शेळके, प्रतिष्ठानच्या उपाध्यक्ष संगीता चंद्रभान फासाटे, हणमंत इराप्पा शेळके, विकास हनमंत शेळके, सौ.प्रियांका विकास शेळके, कु. मुग्धा संजय शेळके, शेळके परिवार उपस्थित होते. वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे कवयित्री सौ. शांताताई शेळके यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तके, गुच्छ देऊन डॉ. शेळके यांचे हस्ते गौरविण्यात आले. शेळके परिवारातर्फे भेटवस्तू देऊन डॉ. अर्चना शेळके यांनी सौ. शांताताई शेळके यांचा सत्कार करण्यात आला. संगीता फासाटे यांनी प्रमाणपत्राचे वाचन केले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांना ‘श्रीरामपूर भूषण पुरस्कार ‘लाभल्याबद्दल प्राचार्य टी. ई. शेळके यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुस्तक, चांदीची श्रीगणेशमूर्ती देऊन सत्कार करण्यात आला.

डॉ. संजय शेळके आपल्या मनोगतात पुढे म्हणाले, सौ. शांताकाकू शेळके ह्या छान कविता करतात हे लवकर माहीत झाले नाही पण त्यांचे लेखन सुरु होते. माझी आई स्व. वत्सलामाई शेळके आम्हाला कायमच्या सोडून गेल्या हे दुःख पचविण्याचे बळ आणि मायेचा आधार आम्हाला सौ. शांताकाकूमुळे मिळाला, त्यांना मिळालेला पुरस्कार त्यांना आणखी लेखनाचे बळ देईल असे सांगून वाचन संस्कृती प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले. सौ.प्रियांका शेळके, कु. मुग्धा शेळके, विकास शेळके, संगीता फासाटे यांनी मनोगत व्यक्त करून कवयित्री सौ. शांताताई शेळके यांनी आपल्या आठवणींचे पुस्तक प्रकाशित करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

सौ. शांताताई शेळके यांनी आपल्या मनोगतातून लेखन अनुभव सांगत अण्णा उर्फ प्राचार्य शेळके यांच्यामुळे शिक्षण, लेखन प्रेरणा मिळाली. डॉ. बाबुराव उपाध्ये हे सतत न लिहित्या हाताला लिहिते करतात. मी गृहिणी आहे पण आता भरपूर लिहिण्याचा प्रयत्न करते. डॉ. संजय शेळके हे श्रीरामपूरमधील एक नामांकित नेत्रतज्ञ असल्याबद्दल आम्हाला सार्थ गौरव वाटतो, अशा नामाकिंत डॉक्टरांच्या शुभहस्ते सत्कार झाला हे खूप समाधानाचे आहे. शेळके परिवाराने सन्मान केला त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. आपला परिवार आदर्श असणे हेच एका आईला खरे समाधान असते असे विचार मांडले. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी आपला झालेला सत्कार हा एक आशीर्वाद असल्याच्या भावना व्यक्त करून प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष पत्रकार प्रकाश कुलथे, प्रा.शिवाजीराव बारगळ यांच्या शुभेच्छा सादर केल्या. संगीता फासाटे यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button