धार्मिक

उंदीरगाव परिसरातील ५०० महिलांनी घेतले पंढरपूर दर्शन

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील उंदीरगाव येथून लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने श्रीक्षेत्र पंढरपूर दर्शन सहल आयोजित करण्यात आली होती. उंदीरगाव येथून परिसरातील ५०० महिलांच्या १० बसेस शनिवारी सकाळी ७ वाजता निघाल्या.

बसेसचा शुभारंभ माजी चेअरमन सुरेश गलांडे, संचालक वीरेश गलांडे, राजेंद्र पाउलबुद्धे, राजू नाईक, राजू गिर्हे, रमेश गायके, भाऊ बांद्रे, भीमराज बागुल आदींच्या हस्ते श्रीफळ वाहून करण्यात आला. तसेच लोकसेवा विकास आघाडी, अशोक कारखाना चेअरमन, माजी आ.भानुदास मुरकुटे व सर्व संचालक तसेच युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे, सौ मंजुश्रीताई मुरकुटे आदींनी प्रगतीनगर येथे सर्व बसेसच्या महिलांना शुभेच्छा दिल्या व पुढील प्रवासाचा शुभारंभ करण्यात आला.

रस्त्यात करमाळा येथील कमलादेवीचे दर्शन घेऊन, भोजन करून पुढे पंढरपूर येथे सायंकाळी ६.३० चे दरम्यान सर्व बसेस पोहोचल्या. त्या ठिकाणी पंढरपूर येथे विठोबा रुखमाईचे सर्वांनी दर्शन घेतले. रविवारी पुन्हा निघण्यापूर्वी चंद्रभागा नदीत स्नान करून सर्वांचे श्रीक्षेत्र पंढरपूर येथे दर्शन झाले. हरिपाठ, काकडा व भोजन झाल्यावर परतीचा प्रवास सुरु झाला व सायंकाळी ८.३० दरम्यान सर्व बसेस पुन्हा उंदिरगाव येथे सुखरूप परतल्या. प्रवास अतिशय चागल्या प्रकारे आनंदात झाला. बस चालकांनी सुद्धा उत्तम सहकार्य केले. पंढरपूर येथे युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे व सौ मंजुश्रीताई मुरकुटे यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

लोकेसेवा विकास आघाडीचे लोकनेते चेअरमन भानुदास मुरकुटे, सिद्धार्थ मुरकुटे, सौ मंजुश्रीताई मुरकुटे, संचालक वीरेश गलांडे, उपाध्यक्ष, व सर्व संचालक, व माजी चेअरमन सुरेश गलांडे, राजेंद्र पाउलबुद्धे, राजू नाईक आदींना पंढरपूर दर्शन सहलीचा आनंद मिळाल्याबद्दल सर्व महिला, ग्रामस्थ यांनी धन्यवाद दिले आहेत.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button