अहमदनगर

वाघाचा आखाडा येथे कुपोषित बालकांना लोक सहभागातून पोषण आहारचे वाटप

आरडगांव प्रतिनिधी/राजेंद्र आढावराहुरी तालुक्यातील वाघाचा आखाडा येथील अंगणवाडी शाळेत ग्राम बाल विकास केंद्र अभियाना अंतर्गत कुपोषित बालकांना पालकांच्या लोक सहभागातून मोफत पोषण आहारचे वाटप करण्यात आले आहे.


राज्य सरकारच्या ग्राम बाल विकास केंद्र अभियाना अंतर्गत कुपोषण मुक्त शाळा होण्यासाठी येथील पालक अनिल कटारे, कैलास धसाळ, धनंजय सप्रे, मोहन तनपुरे, प्रवीण धसाळ, तसेच महिला पालक मयुरी काळे, नंदाताई सप्रे, वनिता सप्रे यांनी बालकांना सशक्त व सुदृढ बनविण्यासाठी या उपक्रमात एक महिनाभर अंगणवाडी शाळेत केळी, सफरचंद, अंडी, आमलेट, शिरा, उपमा, उकडलेले बटाटे, दही साखर रोजच्या जेवणात भाजीपोळी, दाळभात अशा प्रकारचा दररोज लोक सहभागातून कुपोषित बालकांना सकस आहार दिला आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी येथील तरुण मंडळानी मोठा सहभाग नोंदवला आहे. तसेच अंगणवाडी सेविका शिंदे, कटारे यांनी कुपोषित बालकांना सकस आहार याविषयीची उपयुक्त माहिती दिली आहे.

Related Articles

Back to top button