ठळक बातम्या

कृषी विद्यापीठातील कार्यक्रमावर शिवसेना पदाधिकाऱ्यांचा बहिष्कार – राजेंद्र देवकर

शिवसेना प्रमुखांनी कार्यक्रमाला वेळ देवू नये - कमलाकर कोते

राहुरी : येथिल महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र कृषी विद्यापीठे ५१ वि संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीची बैठक २०२३ आणि कृषी समितीची बैठक याचा उदघाटन समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे कृतीशील मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे व प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस तर प्रमुख उपस्थिती मध्ये ना.राधाकृष्ण विखे पाटील, ना.अब्दुल सत्तार हे असणार आहेत.

सदर कार्यक्रम पत्रिकेत मान्यवरांच्या यादी मध्ये जिल्ह्यतील व जिल्हा बाहेरील लोकप्रतिनिधी व इतर मान्यवरांची नावे टाकलेली आहे. तसे पाहता राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे पक्ष प्रमुख ना.एकनाथजी शिंदे यांना अहमदनगर जिल्ह्यात कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बोलवायचे व शिवसेना पक्षाचे जिल्ह्यातील एकमेव लोकप्रतिनिधी असलेले खा.सदाशिव लोखंडे यांचे नाव जाणीवपूर्वक कार्यक्रम पत्रिकेतून वगळायचे हि भूमिका विद्यापीठाचे कुलगरू प्रशांत पाटील यांनी घेतलेली दिसत आहे.

खा.लोखंडे यांचे नाव म.फु.कृ.वि.च्या कार्यक्रम पत्रिकेतून वगळल्या मुळे नगर जिल्ह्यातील शिवसैनिक आक्रमक होत कुलगुरू प्रशांत पाटील यांचा निषेध व्यक्त करत मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांना पत्र पाठवत महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे होणाऱ्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकलेला आहे. तसेच पत्राद्वारे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावू नये अशी विनंती केली आहे, असे शिवसेना उत्तर जिल्हा प्रमुख राजेंद्र देवकर व उत्तर जिल्हा प्रमुख कमलाकर कोते यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांत पाटील यांनी कृषी विद्यापीठ म्हणजे राजकीय आखाडा नाही हे ध्यानात घेतले पाहिजे. त्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून विद्यापीठ परिसरात मनमानी कारभार चालू केलेले आहेत असे आमच्या लक्षात येत आहे. विद्यापीठ परिसरात अनेक पिढ्यांचे जुने पारंपारिक मंदिरे आहेत, या पैकी याच परिसरात शिवलिंग (महादेव) मंदिर आहे, हे मंदिर काढण्याचे तोंडी आदेश या कुलगुरूंनी दिलेले आहेत असे समजते. हिंदू मंदिरांची मोडतोड करून विटंबना केल्यास हिंदूंच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी कुलगुरू पाटील यांनी ठेवावी. कुलगुरू यांनी तात्काळ त्यांचा म.फु.कृ.वि.मधील मनमानी कारभार थांबवावा अन्यथा शिवसैनिक सेना स्टाईल ने उत्तर देतील.

_देवेंद्र लांबे; शिवसेना राहुरी तालुकाध्यक्ष

पत्रकावर आध्यत्मिक आघाडीचे जिल्हा प्र. ह.भ.प. संपत काका जाधव महाराज, उपजिल्हाप्रमुख अण्णासाहेब म्हसे, उपजिल्हाप्रमुख जयवंत पवार, राहुरी तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे, राहुरी तालुका ३२ गाव प्रमुख सुनिल कराळे, ता.संपर्क प्रमुख अशोक तनपुरे, शेतकरी आ.अध्यक्ष किशोर मोरे, तालुका संघटक प्रशांत खलेकर, उपतालुका प्रमुख महेंद्र उगले यांची नावे आहेत.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button