अहमदनगर

निसर्ग व सामाजिक पर्यावरण संस्थेच्या राज्य प्रसिध्दी प्रमुख पदी कोंडीराम नेहेंची निवड

राहुरी | बाळकृष्ण भोसले : राहाता तालुक्यातील लोहगाव येथील पत्रकार कोंडीराम नेहे यांची निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या राज्य प्रसिद्धी प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. नेहे यांच्या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

यासंदर्भात नियुक्तीचे पत्र पर्यावरण मंडळाचे राज्य अध्यक्ष प्रमोद मोरे यांनी त्यांना नुकतेच दिले आहे.  पत्रकार कोंडीराम नेहे पत्रकारीता क्षेत्रात अनेक दिवसांपासून कार्यरत असून विविध विषयांवर त्यांनी लिखाण करत सामाजिक प्रबोधन केले आहे. विशेषतः पर्यावरण विषयक उपक्रमात त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. याच त्यांच्या अनुभव व सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची राज्य कार्यकारणीवर निवड करण्यात आली.

त्यांच्या निवडीबद्दल सचिव वनश्री मोरे, जिल्हा अध्यक्ष तुकाराम अडसूळ, लोखंडे, पोपट पवार, पत्रकार सुभाष कोंडेकर, विजय बोडखे, दिलीप धावणे, माहिती अधिकार संघर्ष समितीचे अध्यक्ष गोरख गवारे, कुणाल गायकवाड, शरद तांबे, राजेंद्र गडकरी, बाळकृष्ण भोसले, ज्ञानेश्वर जोरी, सुरेश ठोके, मच्छिंद्र यादव, डॉ. अनिल बेंद्रे, रविंद्र काकडे, नानासाहेब शेळके, डॉ. शरद दुधाट, बाबासाहेब अंत्रे, कचरू जोर्वेकर, सुनील सिनारे आदींसह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button