साहित्य व संस्कृती

सत्कारामुळे सत्कार्याला अधिक गती मिळते -कवयित्री संगीता फासाटे

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : साहित्य ही माझी भक्ती आहे, शिक्षण हा देव आहे आणि माणुसकी हा माझा धर्म आहे, कार्यनिष्ठ राहणे यातच खरे समाधान आहे, या प्रवासवाटेवर काही सद्गुणी व्यक्तिमत्वांनी दिलेले पुरस्कार आणि सत्कार हे मला अधिक प्रेरक आणि माझ्या सत्कार्याला गतीशील बनवितात, असे विचार कवयित्री सौ. संगीता फासाटे यांनी व्यक्त केले.

येथील इंदिरानगरमधील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे कवयित्री संगीता फासाटे /कटारे यांचा पुरस्कारनिमित्त सत्कार करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या. वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष डॉ. बाबुराव उपाध्ये, माजी गटशिक्षणाधिकारी सुलोचनाताई पटारे / पुरनाळे यांनी हा सन्मान केला. परिश्रमशीलता आणि जीवनगतिशीलता असली की प्रगती होते असे गटशिक्षणाधिकारी पटारे यांनी सांगितले.

डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी कवयित्री संगीता फासाटे यांच्या ‘मायजानकी ‘ कवितेचे मोठेपण सांगितले. स्व. खासदार, माजी मंत्री गोविंदराव आदिक यांच्या मातोश्री वरच्या या कविता मौलिक आहेत. स्व. प्रा.रायभान दवंगे यांच्या ‘तांड्याच्या कविता’ वर केलेले एम. फिल. संशोधन सकस आहे, मराठी ग्रामीण गेय कवितेवर त्यांचे पीएच. डी. संशोधन दिशादर्शक होत आहे,त्यांचा सन्मान हा त्यांच्या कार्याचे फळ आहे, असे डॉ. उपाध्ये यांनी सांगितले. संगीता फासाटे यांनी विविध उपक्रमाची माहिती देऊन सत्कार्याबद्दल आनंद व्यक्त केला. अशोकराव कटारे यांनी सर्वांचे आभार मानले.

याप्रसंगी माजी गटविकास अधिकारी शाम पुरणाळे, माजी गटशिक्षणाधिकारी के.एल.पटारे, प्राचार्या सुमती औताडे, शिक्षक चंद्रभान फासाटे, महादेव गर्जे, भानुदास गोरे, कणगरे, शंकरराव शेलमकर, बाळासाहेब बनकर, डॉ.स्वप्निल पुरणाळे, सुरेश पवार, जालिंदर जाधव, रावसाहेब औताडे, बाबासाहेब भालदंड, कर्णे, सागर भोंगे, तुषार वाणी, सिध्देश कटारे, संतोष कवडे, संजय साळवे, भिमनाथ कटारे, मच्छिंद्र थोरात, संगीता गोडगे, कल्पना फासाटे, विद्या फासाटे, उर्मिला फासाटे, मंदाताई कटारे, कुलकर्णी, थोरात, चाबुकस्वार आदी उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button