शिक्षणवारी ज्ञान पंढरी

प्रिया झीने हिस अमेरिकेतील एम एस पदवी प्रदान

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : कु. प्रिया राजुसाहेब झिने हिची वेस्टन मिशिगन युनिव्हर्सिटी अमेरिका येथे उच्च शिक्षणासाठी निवड झाली. तिथे तिने कठीण अभ्यासक्रम मोठ्या मेहनतीने पूर्ण केला.

तिचे नर्सरी ते दहावीपर्यंत चे शिक्षण डी पाँल इंग्लिश मिडीयम स्कूल श्रीरामपूर येथे झालेले असुन इंजिनिअरिंग ची पदवी एम आय टी काँलेज पुणे येथुन मिळविलेली आहे. तिने अनेक परीक्षांमध्ये मिळविलेल्या यशाबद्दल अमेरिकेतील वेस्टन मिशिगन युनिव्हर्सिटी मधील एम. एस. डिग्री तिला सन्मानाने नुकतीच प्रदान करण्यात आली. खा.गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या बेलापूर कंपनी हायस्कूल हरिगाव येथील मुख्याध्यापक राजुसाहेब झिने व सौ.शारदा झिने यांची ती कन्या आहे.

तिच्या या उत्तुंग यशाबद्दल संस्थेचे सचिव अविनाश आदिक, लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ बबनराव आदिक, सहसचिव ॲड.जयंत चौधरी, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य हंसराज आदिक, व संस्थेतील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक- शिक्षिका आदींनी कु.प्रिया हिचे अभिनंदन केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button