अहमदनगर

शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी लस घ्या-अमित भांगरे

राहुरी विद्यापीठ/जावेद शेखअकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेंडी आयोजित राष्ट्रीय सेवा योजना व प्राथमिक आरोग्य केंद्र शेंडी, भंडारदरा यांच्या संयुक्त विद्यमाने शेंडी कनिष्ठ महाविद्यालयातील 18 वर्षापुढील विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी लस घ्यावी असे आवाहन अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक तथा यशवंत युथ फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष अमितराव भांगरे यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य तथा शेंडीचे विद्यमान सरपंच दिलीपराव भांगरे हे होते. प्रमुख उपस्थितीत शेंडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष चोळके, प्राचार्य डी.एन. रोंगटे, गोपी भांगरे आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन कनिष्ठ महाविद्यालय शेंडी येथे केले जाते.

विद्यार्थ्यांच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने कोविड 19 लसीकरण महत्त्वाचे आहे. यासाठी लसीकरण मोहीम आयोजित केली. यशवंत युथ फाउंडेशनच्या साह्याने शेंडी कॉलेजला स्मार्ट कॉलेज बनवून स्पर्धा परीक्षा केंद्र क्रीडा केंद्र उभारण्यासाठी निश्चित मदत केली जाईल. परंतु विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घेऊन ध्येय गाठणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अमित भांगरे यांनी केले.

तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य रोंगटे डी. एन. यांनी यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच दिलीपराव भांगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी शेंडी ज्युनिअर कॉलेजच्या वतीने कोविड योध्ये म्हणून कार्यरत असलेले डॉ.संतोष चोळके, कदम एस.एस., डी एम थोरात, एच डी बिडवे, पवार, सोनुले एस वि, यांचा सन्मान करण्यात आलाा. वरिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने अमित भांगरे यांचा सत्कार प्रा.सुनील वाळुंज, प्रा.त्र्यंबक बांडे यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी महेश पाडेकर यांनी तर आभार रवींद्र गायकवाड यांनी मांडले.

याप्रसंगी विद्यालयाचे नरेश खाडगीर, शिवाजी बुरके, आनंद चौधरी, दीपक बाळसराफ, एकनाथ मुकणे, विकास आवारी गणेश वैद्य, किरण आवारी, दत्तात्रय महाले, प्रभाकर गावंडे, सीमा सावंत, सुलोचना डोळस, रवींद्र मेंगाळ आदी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button