आरोग्य

जिल्हा रुग्णालय येथे राहुरी तालुक्यातील दिव्यांगांसाठी प्रमाणपत्र शिबिराचे आयोजन

राहुरी – जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे दिव्यांग प्रमाणपञ शिबिराचे आयोजन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी व नगर तालुक्यातील दिव्यांगांसाठी शुक्रवार, दि. 26 मे 2023 रोजी 9 ते 12 या वेळेत विशेष शिबिराचे आयोजन केले आहे.

तरी राहुरी व नगर तालुक्यातील ज्या दिव्यांग बांधवांनी आजपर्यंत ऑनलाईन प्रमाणपत्र काढले नाही किंवा युनिक आयडी कार्ड मिळाले नाही. त्यांनी उपस्थित राहून आपली तपासणी करून प्रमाणपत्र काढता येणार आहे. प्रहार दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कळविण्यात येते की, आपल्या गावातील किंवा शेजारच्या गावात जो कोणी दिव्यांगानी आत्तापर्यंत प्रमाणपत्र काढले नाही, त्यांच्या पर्यत माहीती देणे गरजेचं आहे. अजून काही ग्रामीण भागात बऱ्याच दिव्यांगांनी प्रमाणपत्र काढले नाही म्हणून शासनाच्या योजनेपासुन वंचित आहे.

तसेच ज्या दिव्यांगांनी आतापर्यंत युनिक कार्ड काढले नाही त्यांनी येण्यापुर्वी युनिक कार्ड साठी नोंदणी करून नोंदणी केल्याची पावती, आधार कार्ड झेराॅक्स, रेशन कार्ड झेराॅक्स, दोन पासपोर्ट फोटो सोबत आणावेत, असे आवाहन दिव्यांग शक्ती सेवा संस्था राहुरी व अहमदनगर जिल्हा प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणराव पोकळे, उत्तर जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे, जिल्हा सचिव हमीद शेख, जिल्हा सल्लागार सलीमभाई शेख, राहुरी तालुकाध्यक्ष योगेश लबडे यांनी केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button