अहमदनगर

सोनगाव येथे आधार मेळावा संपन्न

राहुरी : तालुक्यातील सोनगाव येथील प्रथम सरपंच स्व. कुंडलिकराव मारुती पा अंत्रे सभागृहामध्ये  ग्रामपंचायत सोनगाव आणि भारतीय डाक विभागाच्या संयुक्त विद्यमाने नुकताच एकदिवसीय आधार मेळावा संपन्न झाला.
यावेळी पंचक्रोशीतील अनेक नागरिकांनी या मेळाव्यात सहभाग नोंदवला असून आप-आपले आधार कार्ड अपडेट केले. किसान सन्मान योजनेचे ई-केवायसी करणेसाठी, PAN काढनेसाठी, Driving License काढनेसाठी, बँकेत खाते उघडण्यासाठी, शेअर मार्केट मध्ये खाते (D-Mat) उघडण्यासाठी, हेल्थ कार्ड काढण्यासाठी तसेच आधार संबंधीत सर्व कामे आधार ला मोबाईल क्रमांत लिंक करणे, पत्त्यात बदल, नावात बदल, जन्म तारीख दुरुस्ती, हाताचे ठसे अपडेट  करणे, 5 वर्षाच्या आतील बाळाचे आधार कार्ड काढणे आदी प्रकारच्या सेवांचा नागरिकांना लाभ घेता यावा म्हणून या एकदिवसीय आधार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सोनगाव चे सरपंच अनिल अनाप, उपसरपंच तथा ओबीसी युवा मोर्च्याचे जिल्हा उपाध्यक्ष किरण पाटील अंत्रे, ग्रामविकास अधिकारी एच बी पटेल, डाक विभागाचे प्रसाद तऱ्हाळ, सब पोस्टमास्तर प्रवरानगर सुनील आंबेकर, सब पोस्टमास्तर लोणी बुद्रुक हेमंत खडकेकर, अधिक्षक डाकघर श्रीरामपूर विभाग राविकुमार झावरे, सहाय्यक अधिक्षक कोपरगाव उपविभाग विनायक शिंदे, तक्रार निरीक्षक श्रीरामपूर विभाग संदीप अंत्रे, प्रणाली व्यवस्थापक सिस्टीम अडमिनिस्टेटर संदीप अनाप, एजाज तांबोळी, पाराजी अंत्रे, मच्छिंद्र अंत्रे, आबासाहेब अनाप, सचिन अंत्रे, पांडुरंग पवार, तुषार अंत्रे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डाक विभागाच्या अधिकारी वर्गाचा ग्रामपंचायत च्या वतीने सत्कार करण्यात आला.

Related Articles

Back to top button