शिक्षणवारी ज्ञान पंढरी

वळण येथील शिक्षकांच्या रिक्त पदांबाबत बालदिनी झालेले उपोषण मंत्री तनपुरेंच्या मध्यस्थीनी सुटले

अहमदनगर/जावेद शेख : राहुरी तालुक्यातील वळण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील रिक्त असलेल्या शिक्षकांच्या पदांची तात्काळ नेमणूक करावी यासाठी बालदिनी झालेल्या उपोषणाबाबत राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांनी तात्काळ लक्ष घालून लेखी आश्वासन देऊन सदर उपोषण सोडविले आहे. 
येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक सह रिक्त शिक्षकांची पदे तात्काळ भरू असे तालुका गट शिक्षण अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी लेखी पञ उपोषणकर्त्यांना दिले आहे. राहुरी तालुक्यातील वळण येथील जिल्हा परिषद सेमी इंग्रजी शाळेत मुख्याध्यापकासह रिक्त शिक्षकांची पदे तात्काळ भरावीत या मागणीसाठी शाळा व्यवस्थापन समितीसह सरपंच, उपसरपंच आणि पालकांनी पंचायत समिती आवारात आमरण उपोषण आंदोलन छेडले होते.
वळण येथे इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत वर्ग असून सुमारे तीनशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या शाळेत गेल्या तीन वर्षापासून ग्रेड मुख्याध्यापकास एक उपाध्याक आणि एक पदवीधर शिक्षक पदे रिक्त होते.  त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असून शैक्षणिक दर्जा देखील खालवण्याची संभावना होती. म्हणून येथील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पञकार गोविंद फुणगे, सरपंच सुरेश मकासरे, उपसरपंच एकनाथ खुळे, जेष्ठ सदस्य अशोक कुलट, उमेश खिलारी, संतोष बनकर, फकीरचंद फुणगे, सुनिल खिलारी, रविंद्र गोसावी, आण्णासाहेब मकासरे, पिनू कार्ले, संदिप आढाव, संदिप भोगे, पञकार वसंतराव आढाव, किशोर म्हस्के, गणेश कार्ले, किरण आढाव, रमेश काळे, सतिष आढाव, उंबरे -कारवाडी येथील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष भाऊराव कवडे हे आमरण उपोषणास बसले होते.
सदर उपोषणास तनपुरे कारखान्याचे माजी संचालक बाबा खुळे, शाळा व्यवस्थापनचे माजी अध्यक्ष अशोक काळे, युवा सेनेचे तालुकाध्यक्ष धनंजय आढाव त्यांनी पाठिंबा दर्शवला. दरम्यान पंचायत समिती कार्यालयात पंचायच समितीचे माजी उपसभापती तथा सदस्य रवींद्र आढाव, राष्ट्रवादी चे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब खुळे, सुरेश निमसे, सुरेश बानकर राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे स्विय्य सहाय्यक रवींद्र मांडे, सोमनाथ अनाप आदिंनी गट विकास अधिकारी गोविंद खामकर, गटशिक्षणाधिकारी सुनिल सुर्यवंशी तसेच वरीष्ठाशी चर्चा करून वळण शाळेतील रिक्त पदे भरण्याचा लेखी आश्वासन दिले. त्यामुळे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे तसेच उपोषण स्थळी उपस्थित असलेल्या सर्वाचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पत्रकार गोविंद फुणगे यांनी आभार व्यक्त केले

Related Articles

Back to top button