ठळक बातम्या

छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने पूरग्रस्तांना मदतीचा हात

नाशिक (प्रतिनिधी) : युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत छावा क्रांतिवीर सेना व समस्त भूम व पाथरूडकर यांनी पूरग्रस्तांना मदतीचा हात पुढे केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हालोंडी, शिरोली, रुई, चंदूर येथील पूरग्रस्तांना तेल, तूरडाळ, पोहे, गरा, ज्वारी, गहू, तांदूळ,  कोलगेट, साबण, पार्ले बिस्किटे, शेंगदाणे, साखर, चहा पावडर १० दिवस पुरेल अशी प्रत्येक गावात १०० या प्रमाणे किराणा धान्यकिट पोहच केले आहे.

या कामाबद्दल छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर, प्रदेश उपाध्यक्ष बाबा रोटे,प्रदेश प्रवक्ते जीवनराजे इंगळे, मराठवाडा संपर्क प्रमुख अमरभाई शेख, जिल्हा प्रमुख महेश गवळी आदींनी कौतुक केले आहे. यावेळी छावा क्रांतिवीर सेना युवक तालुका अध्यक्ष गणेश नलवडे, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष अर्जुन जाधव, समाजसेवक विठ्ठल बाराते, अजय शेंडगे, महेश गुळमे, शेळके आदि उपस्थीत होते.


अत्यंत चांगल्या पद्धतीने गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचवली जात आहे. या पुढे लवकरात लवकर आणखी मदत पूरग्रस्त भागात संघटनेच्यावतीने पोहोचवली जाईल.अशी माहिती
छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी दिली आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button