ठळक बातम्या

दिल्ली येथे पेन्शनधारकांचे आंदोलन सुरु

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : इपीएस 95 पेन्शनधारकांचा पेन्शनवाढीचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला नसल्याने तीन दिवसांपासून नवी दिल्ली जंतर मंतर येथे राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत यांच्या नेतृत्वाखाली शृंखला अनशन सुरु असून त्यात लखनौ अध्यक्ष उमाकांत सिंग, महिला आघाडी संघटक सौ.सरीता नारखेडे, राष्ट्रीय सल्लागार पी.एन.पाटील, राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत, समन्वयक रमाकांत नरगुंड, पश्चिम भारत संघटक सुभाषराव पोखरकर, उत्तर भारत संघटक सुरेश डंगवाल आदींसह मोठ्या पेन्शनर्स सहभागी झाले आहेत.

दिल्ली येथील आंदोलनात राज्यवार पेन्शनर्स सहभागी झाले असून आज उत्तर प्रदेशातील ४०० च्यावर पेन्शनर्स सहभागी झाले होते. गुरुवारी जाहीर झालेल्या बजेट मध्ये देशाभरातील 70 लाख पेन्शनधारकांचा प्रश्न मार्गी लागून काहीतरी घोषणा होईल अशी आशा होती. बजेट मध्ये उल्लेख झाला नसल्याने लाखो पेन्शनर्स नाराज झाले आहेत. लोकसभा निवडणूक पूर्वी निर्णय न झाल्यास सत्ताधारी पक्षांस मतदान करणार नाही असे दिसते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button