ठळक बातम्या

मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांचा राहुरी कृषी विद्यापीठ दौरा रद्द – राजेंद्र देवकर

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील ढिसाळ कारभाराची चौकशीची मागणी करणार- देवेंद्र लांबे

राहुरी – महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे गुरुवार दि.२५ मे रोजी विविध कार्यक्रमांसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे उपस्थित राहणार होते. या कार्यक्रम पत्रिकेत शिवसेनेचे शिर्डी लोकसभेचे खा.सदाशिव लोखंडे यांचे नाव न टाकल्यामुळे जिल्हा प्रमुख राजेंद्र देवकर, राहुरी तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कृषी विद्यापीठ येथील कार्यक्रमास उपस्थित राहू नये अशी विनंती केली होती.

कृषी विद्यापीठातील कार्यक्रमावर शिवसैनिकांनी टाकलेला बहिष्कार व कुलगुरू प्रशांत पाटील यांच्या विरोधात केलेला निषेध या सर्व गोष्टींमुळे समाज माध्यमांवर विविध चर्चा घडत होत्या. शिवसैनिक कुलगुरू प्रशांत पाटील यांच्या विरोधात उभे राहिल्यामुळे पोलिस प्रशासनापुढे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार होती हे निश्चित झाले होते.

दि. २४ मे रोजी सायंकाळीच अचानक मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांचा रत्नागिरी जिल्हा दौरा कार्यक्रम ठरविण्यात आल्याचे मुख्यमंत्री साचिवालयातून पत्र काढण्यात आले आहे. शिवसैनिकांनी केलेल्या मागणीचा विचार करत ना.एकनाथ शिंदे यांनी राहुरी कृषी विद्यापीठ येथील कार्यक्रमाला येण्याचे टाळले असे सर्वत्र बोलले जात आहे. यापुढे सर्व शासकीय कार्यक्रमात स्थानिक लोकप्रतिनिधी यांना विचारात घ्यावे लागणार आहे असे या सर्व घटनाक्रमावरून दिसून येत आहे.

सर्वसामान्य शिवसैनिकांच्या भावना लक्षात घेवून एक कुटुंब प्रमुख म्हणून शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी नियोजित कार्यक्रम रद्द केल्यामुळे कुलगुरू प्रशांत पाटील यांना शिवसैनिकांनी एक प्रकारे धडाच शिकवला आहे. या पुढे कृषी विद्यापीठातील गैरकारभार बाबत मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे सर्व दस्तावेज देवून कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे यांनी सांगितले.

शिवसैनिकांच्या भावनेचा गंभीर पूर्वक विचार केल्याबद्दल जिल्हा प्रमुख राजेंद्र देवकर, कमलाकर कोते, उपजिल्हा प्रमुख जयंत पवार, अण्णासाहेब म्हसे, युवा सेनेचे शुभम वाघ, राहुरी तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे, संपत जाधव, सुनिल कराळे, किशोर मोरे, अशोक तनपुरे, प्रशांत खळेकर, महेद्र उगले, महेंद्र शेळके, विक्रम फाटे, बापूसाहेब शेरकर, संगम रसाळ, संदीप दातीर, संतोष डहाळे, लक्ष्मण पाचपिंड, गंगाधर सांगळे, शिवनाथ फोपसे आदींनी आभार मानले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button