महाराष्ट्र

कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी घडवले मानवतेचे दर्शन

देवळाली प्रवरा/ राजेंद्र उंडे : विद्यापीठाच्या सेवानिवृत्त 75 वर्षाच्या आजीबाई जायबाई ठकाजी शिंदे या वयोवृद्ध महिला नातवाच्या मोटारसायकल वरुन प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारा जवळ उतरुन वयोवृद्ध महिलेस नातवासह दुसऱ्या व्यक्तीच्या मदतीने उचलून कार्यालयात नेण्याच्या तयारीत असताना कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांचे आगमन झाले. त्यावेळी कुलगुरुंच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर त्यांनी त्वरीत सुरक्षा अधिकारी गोरक्ष शेटे यांना बोलावून संबंधीत महिलेची प्रवेशद्वारा शेजारी बसण्याची व्यवस्था करण्यास सांगुन जागेवरच त्यांच्या हयातीच्या दाखल्याची पुर्तता संबंधीत कार्यालयाने करुन त्यांना सरकारी वाहनाने त्यांच्या घरी पोहचविण्याची व्यवस्था करण्याचे आदेश कुलगुरु डॉ. पाटील यांनी देवून मानवतेचे दर्शन घडवले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची  वर्दळ सध्या पहायला मिळत आहे. नियमाप्रमाणे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्यात हयातीचा दाखला स्वतः आणुन द्यावा लागतो. मंगळवार दि. 23  रोजी सकाळी प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ  सेवानिवृत्त 75 वर्ष वयाच्या वयोवृद्ध जायबाई ठकाजी शिंदे रा. धामोरी ता. राहुरी या त्यांच्या नातवाने मोटारसायकलवर प्रशासकीय कार्यालयात हयातीचा दाखला देण्यासाठी आल्या होत्या. त्यांना मोटारसायकल वरुन उतरुन नातवाने दुसऱ्याच्या मदतीने उचलून प्रशासकीय कार्यालयात नेत असताना त्या ठिकाणी  कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांचे आगमन झाले.
कुलगुरु पाटील यांनी थांबुन हि गोष्ट बारकाईने न्याहळली. कुलगुरुंनी त्वरीत सुरक्षा अधिकारी गोरक्ष शेटे यांना बोलावून घेत संबंधीत महिलेची प्रवेशद्वारा शेजारी बसण्याची व्यवस्था करण्यास सांगितले. जागेवरच त्यांच्या हयातीच्या दाखल्याची पुर्तता संबंधीत कार्यालयाने करुन घेण्याचे आदेश दिले. आजीबाईस  सरकारी वाहनाने त्यांच्या घरी पोहचविण्याची व्यवस्था करण्याचे आदेश कुलगुरु डॉ. पाटील यांनी दिले. प्रशासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी प्रवेशद्वारा जवळच या वयोवृद्ध महिलेचा हयातीचा दाखला व इतर बाबी पुर्ण करुन घेतल्या. त्यानंतर सुरक्षारक्षक गोरक्ष शेटे व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी वयोवृध्द महिलेस सरकारी वाहनाने त्यांच्या घरी पोहचविले.
यावेळी डिग्रस येथील रहिवाशी असलेल्या आणखी एक वयोवृध्द महिला श्रीमती गयाबाई मुरलीधर शिंदे या रिक्षातून इमारतीसमोर आल्या. त्यांना कोणीही नातेवाईक नसल्याने रिक्षाचालकाने स्वतःच त्यांना आणले होते. त्यांनाही सुरक्षा कर्मचाऱ्यांनी  मदत केली. यावेळी कुलगुरुंच्या या अनोख्या व्यक्तिमत्वाच्या दर्शनाने कर्मचारी वर्गात समाधान व्यक्त होताना दिसले. कुलगुरु डॉ. पाटील यांनी या अगोदर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकरीच्या शेवटच्या दिवशी कार्यालयीन वाहनाने त्यांना घरी पोहचविण्याचा पायंडा विद्यापीठात प्रथमच पाडला असून त्याबद्दलही कुलगुरुंप्रति कर्मचारी वर्गात आदराची भावना दिसून आली आहे.
यापुढील काळात सेवानिवृत्त वयोवृध्द कर्मचारी हयातीचे दाखले व इतर कागदपञांची पुर्तता करण्यास आल्यास प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वारा जवळ बसण्याची व्यवस्था करुन जागेवरच कागदपञांची पुर्तता करुन घेण्याचे आदेश दिले आहे.आजीबाईला कुलगुरु पाटील यांनी केलेल्या मदतीमुळे त्या भारावून गेल्या. त्यांनी कुलगुरु पाटील यांना तोंड भरुन आशिर्वाद दिले.तुम्ही तुमच्या पदापेक्षा मोठ्या पदावर जावो अशी सदिच्छा ही या वयोवृध्द आजीबाईंनी व्यक्त केल्या आहे.

Related Articles

Back to top button