औरंगाबाद

शिवछत्रपती कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा

फोटो : राष्ट्रीय सेवा योजनाचे स्वयंंसेवक विजय चिडे, अमोल तापकीर सह प्राध्यापक वृक्ष लागवड करताना.

विजय चिडे/पाचोड : येथील शिवछत्रपती कला महाविद्यालयात शुक्रवारी (दि.२४) सकाळी अकरा वाजता राष्ट्रीय योजना दिवसानिमित्त वृक्ष लागवड करुन हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.

याप्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डाॅ.शिवाजी यादव हे बोलताना म्हटले की, युवकांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व घडविण्याचे कार्य शिक्षण क्षेत्राद्वारे होत असताना दिसत आहे. प्रभावी व्यक्तिमत्त्व घडवत असताना तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाण व सेवाभाव निर्माण करण्याचे कार्य महाविद्यालयीन स्तरावर राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाद्वारे होत आहे. तरुणांमध्ये समाजसेवेची जाण झाल्यानंतर त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे राष्ट्रसेवा होय. राष्ट्रीय सेवा योजना ही संकल्पना सांगताना त्यात सेवा आणि त्याग हे शब्द युवकांच्या आयुष्यातील सेवेचे महत्त्व विशद करतात. विशेषत: शिक्षण क्षेत्रातून सेवासंस्कार तरुणांवर व्हावा, तरुणांकडून राष्ट्रसेवा घडावी, युवाशक्तीचा उपयोग राष्ट्राला व्हावा, या हेतूने शिक्षण क्षेत्रात विविध योजना वेगवेगळ्या स्तरावर राबविल्या जातात. शिक्षण क्षेत्रात कनिष्ठ स्तरापासून ते उच्चशिक्षण क्षेत्रातील राष्ट्रीय सेवा योजना या उपक्रमापर्यंत राष्ट्रसेवेची व्याप्ती वाढताना दिसून येते असे त्यांनी सांगितले आहे.

तर पुढे प्रा.डाॅ.विलास महाजन यांनी २४ सप्टेंबर हा ‘राष्ट्रीय सेवा योजना दिन’ म्हणून साजरा केला जातो. तसेच या संदर्भात सेवा विद्यार्थ्यांना पुढे मार्गदर्शन करताना म्हटले की, ‘Not me, but you’ माझ्यासाठी नव्हे, तर तुमच्यासाठी हे ब्रीदवाक्य लक्षात घेऊन राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेवक सेवेची मूल्ये आणि सामाजिक भान ठेवून समाजसेवेसाठी तत्पर असतो. आपले उज्ज्वल भविष्य गाठत असतानाच समाज व राष्ट्राला आपण काही देणे लागतो. म्हणून फूल ना फुलाची पाकळी या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाद्वारे राष्ट्रसेवा करण्याचे कार्य महाविद्यालयीन युवक करीत असतो. राष्ट्रीय सेवा योजनेच्या बोधचिन्हाप्रमाणे आजचा स्वयंसेवक हा बोधचिन्हाच्या आठ आरेनुसार अष्टौप्रहर समाजसेवेसाठी बांधील आहे व लाल रंग हे तरुणांचे सळसळते रक्त हे राष्ट्र उभारणीसाठी असल्याचे दिसून येते, असे त्यांनी सांगितले. यावेळी प्राचार्य सुरेश नलावडे, प्रा. डॉ.संतोष चव्हाण प्रा. डॉ.भगवान जायभाये,  प्रा. डॉ.गांधी बानायत, कार्यकर्माधिकारी प्रा. डॉ.विलास महाजन, डॉ.ह. सो. बिडवे, प्रा. तुकाराम गावंडे, प्रा. विनोद कांबळे, प्रा. सचिन कदम, डॉ. विठ्ठल देखणे आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी स्वयंसेवक विजय चिडे, अमोल तपकीर, विशाल वाव्हूले, गणेश लेंभे, सिराज सय्यद, प्रेमराज चिंतामणी, सुनिल निताळ, संध्या पवार, पल्लवी ठोकळ, पुजा ढाकणे, निता लव्हटे, शुभांगी आहेरे आदीने विशेष प्रयत्न केले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button