कृषी

दुग्ध अभिषेक करत महादेवाला शेतकऱ्यांचे दुध दर वाढीचे साकडे

राहुरी: दुध उत्पादक शेतकरी तसेच अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या वतीने मागील महिन्यात दुध दर वाढ व मागील चार महिन्याचा दुध दराचा फरक देण्याची मागणी केली होती.शासनाने दुध दर वाढीबाबत आयोजित केलेल्या बैठकीत व त्यानंतर कुठलाही ठोस निर्णय न घेतल्यामुळे दुध उत्पादक शेतक-यांना कोणीही वाली राहिला नाही असे सिद्ध होत आहे.त्यामुळे श्रावण महिन्याच्या मुहूर्तावर महादेवाला अभिषेक करून सरकारला दुध दर वाढीची सुद्धबुद्दी देवो,असे कोंढवड येथील दुध उत्पादक शेतक-यांनी महादेवाला साकडे घालत आंदोलन केले.

      गेल्या मार्च महिन्यापासून ते आजवर कोरोनाच्या काळात ग्रामीण भागातील शेतकरी मेटाकुटीला आला आहे.शेतकर्यांचा जोडधंदा असलेल्या दुध व्यवसायाला दर मिळत नसल्याने दुध उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे.अशीच परिस्थिती राहिली तर दुध उत्पादक शेतकरी उद्धवस्त होतील.याचे उदाहरण राहुरी येथील दरडगावच्या शेतकऱ्याने दुधाला दर मिळत नसल्याने आत्महत्या केली आहे. कोराना येण्यापुर्वी जो दर होता त्याच दरात दुध विक्री करणारे दुध विक्री करत असताना मग शेतकर्यांकडून खरेदी केलेल्या दुधाला का कमी दर दिला जात आहे ? असा प्रश्न  शेतकऱ्यांना पडला आहे.
     या पार्श्वभूमीवर शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी अखिल भारतीय क्रांतीसेनेने दि. १३ जुलै २०२० रोजी मा. मुख्यमंत्री साहेब, महाराष्ट्र राज्य यांना ई-मेल द्वारे दुधाला किमान ३० रुपये दर व मागील चार महिन्याचा दुध दराचा फरक देण्याची मागणी केली होती.यानंतर मंत्रालयात दुध दर वाढीबाबत दि. २१ जुलै २०२० रोजी बैठक होऊन चर्चा झाली.परंतु बैठकीला १० दिवस उलटूनही आजपर्यंत शासनाकडून कोणतीही अमंलबजावणी झालेली दिसुन येत नाही.उलट बैठकीनंतर दुध संघाकडून दुध उत्पादक शेतक-यांकडुन खरेदी दरात घट करण्यात आली आहे.याचा अर्थ दुध उत्पादक शेतक-यांना कोणीही वाली राहिला नाही असे सिद्ध झाले आहे.त्यामुळे श्रावण महिन्याच्या मुहूर्तावर महादेवाला अभिषेक करून सरकारला दुध दर वाढीची सुद्धबुद्दी देवो,असे साकडे घालण्यात आले.
   यावेळी जगन्नाथ पंढरीनाथ म्हसे, जगन्नाथ भाऊसाहेब म्हसे, गोरक्षनाथ माळवदे, कोंढवडचे उपसरपंच ज्ञानेश्वर म्हसे, क्रांतीसेनेचे संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, किशोर म्हसे, गोरक्षनाथ म्हसे,राहुल म्हसे,लक्ष्मण म्हसे,संदीप म्हसे, नंदकिशोर म्हसे, सुरेश म्हसे, भाऊसाहेब पवार,गोपी म्हसे आदी दुध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button