औरंगाबाद

स. भु. प्रशालेत ‘शिक्षक-पालक संघ’ कार्यकारिणी जाहीर

विलास लाटे /पैठण : तालुक्यातील बालानगर येथील सरस्वती भुवन प्रशालेत शासनादेशाप्रमाणे शिक्षक-पालकसंघाची मुख्याध्यापक शिरीष मोरे यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी सभा होऊन सरस्वतीपूजन व पालकांच्या सत्कारानंतर बालानगर पंचक्रोशीतील पालकांची शैक्षणिक वर्ष २०२१-२२ ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

पदसिद्ध सचिव पदी मुख्याध्यापक शिरीष मोरे, कार्यवाह व शिक्षक प्रतिनिधी राजेंद्र गायकवाड, अध्यक्ष भास्कर गोर्डे, उपाध्यक्ष रीमा ढाकणे, महिला  प्रतिनिधी मंगल सुतार, सदस्य भीमा वीर, अनीस शेख, गीता जालिंदरे, संभाजी चव्हाण, भक्ती परमेश्वर आम्ले, समीत चाबुकस्वार, जयश्री भानुदास गोर्डे, नवनाथ गोर्डे, अमजद आंबेकर, ज्योती रूळे, विजय नलावडे, उज्ज्वला फोफसे, प्रल्हाद गोर्डे, शोभा वीर, सोपान तांबे, आफसाना शेख, प्रकाश लिपाने, सीता गोर्डे, चंद्रकांत गोर्डे, सविता अरूण तांबे, अशोक वैष्णव, यमुना तांबे, गोविंद भालेकर, ज्योती चिंतारे या कार्यकारिणीच्या उपस्थितीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
त्यात प्रशालेच्या सर्वांगीण विकासात सर्वच पालकांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांत संगणक साक्षरता रूजविण्यासाठी कार्यानुभव तासिकेत सशुल्क संगणक शिक्षण देण्यास परवानगी देण्यात आली. प्रशालेच्या भौतिक विकासात उदा. इमारत, स्वच्छतागृह बांधकामासाठी आर्थिक निधी उभारण्यासाठी प्रयत्नशील राहणे, प्रशालेत पहिली ते चौथी व अकरावी-बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणे आदी मुद्यांवर खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा करण्यात आली. अध्यक्षीय समारोपात मुख्याध्यापक  शिरीष मोरे यांनी प्रशालेच्या विद्यार्थीहिताच्या उपक्रमात पालकांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. प्रास्तविक राजेंद्र गायकवाड यांनी तर सूत्रसंचालन व आभार पद्माकर वाघरूळकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वच शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व नागरिकांचे सहकार्य लाभले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button