ठळक बातम्या

क्रीडा संकुलास भरीव अर्थसाहाय्य करू – क्रीडा राज्यमंत्री आदितीताई तटकरे

क्रीडा राज्यमंत्री ना. आदितीताई तटकरे यांच्यासोबत क्रीडा संकुला संदर्भात चर्चा करताना आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस.


व्हिडिओ : क्रीडा संकुलास भरीव अर्थसाहाय्य करू – क्रीडा राज्यमंत्री तटकरे


अहमदनगर प्रतिनिधी : राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने क्रीडा राज्यमंत्री आदितीताई तटकरे यांनी देवळाली प्रवरा येथील क्रीडा संकुलास भरीव अर्थसाहाय्य करण्यात येईल, असे आश्वासन देवळाली प्रवरा येथील मेडिकल हेल्प टीमच्या सदस्यांना दिले आहे.
अहमदनगर वडिया पार्क येथे राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंना प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्यास व त्यांचा शासकीय सन्मान करण्यासाठी निमंत्रण मिळाल्याने देवळाली प्रवरा येथील शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय खेळाडू अप्पासाहेब ढूस हे उपस्थित होते. त्यांच्या समवेत देवळाली प्रवरा मेडिकल हेल्प टीमचे सदस्य ऋषिकेश संसारे आणि राहुरी अर्बन पतसंस्थेचे चेअरमन रामभाऊ काळे हे देखील नामदार तटकरे यांच्यासमोर देवळाली प्रवरा येथील क्रीडा संकुलाचा प्रश्न मांडण्यासाठी उपस्थित होते.

अहमदनगर येथील वडियापार्क मध्ये आयोजित राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी क्रीडा मंत्री नामदार आदितीताई तटकरे यांच्यासह नगरचे आमदार संग्रामभैय्या जगताप, जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्ह्यातील सर्व शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू तसेच आंतरराष्ट्रीय पदक विजेते खेळाडू, जिल्ह्यातील क्रीडा संघटनेचे प्रमुख यांच्यासह अनेक खेळाडू व मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी देवळाली प्रवरा येथील क्रीडा संकुल आणि खेळाडूंच्या विविध प्रश्नांबाबत देवळाली प्रवरा मेडिकल हेल्प टीमच्या वतीने आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढूस यांनी अहमदनगर येथे राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री नामदार आदितीताई तटकरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली, त्याप्रसंगी राहुरी तालुक्यात अद्याप पर्यंत तालुका क्रीडा संकुल झाले नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त करून तालुका क्रीडा संकुुलासाठी असलेला 5 कोटी रुपयेचा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच ढूस यांनी सुचविलेल्या देवळाली प्रवरा शहरातील कृषी विभाग आणि महाराष्ट्र शासनाच्या जागेची पाहणी करून योग्य त्या जागेवर लवकरात लवकर क्रीडा संकुल उभारणीसाठी उचित कार्यवाही करू, असे आश्वासन दिले.

Related Articles

Back to top button