महाराष्ट्र

31 ऑक्टोबर रोजी अर्थराज्यमंत्री यांच्या उपस्थितीत औरंगाबादला पेन्शनर्स राज्यस्तरीय मेळावा

श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : इपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समिती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षते खाली राज्य स्तरीय मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यासाठी केंद्रिय अर्थ राज्य मंत्री आदरणीय डॉ.भागवत कराड हे उपस्थित राहणार आहे.

या ई.पी.एस.९५ पेन्शन संघटने मध्ये सर्व खाजगी कंपन्या, सर्व सहकारी बँक, सर्व सहकारी साखर कारखाने, व सर्व विविध महामंडळे व इतर यामध्ये काम करणारे सर्व 186 उद्योग- धंदे यातले कामगार व कर्मचारी हे येतात. पण सरकार च्या काही धोरणा मुळे कामगार वर्गाला कमी पेंशन मिळत आहे. या महागाई च्या काळात पेंशन वाढ साठी कमांडर यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकार चे प्रधानमंत्री आणि इतर संबंधित मंत्री-अधिकाऱ्यांना भेटून प्रभावी तोड़गा काढण्यासाठी चे प्रयत्न सुद्धा झाले आहेत,येत्या काही दिवसां मधे त्याला यश देखील भेटेल या खात्रीने आणि पुढील वाटचाल कशी असली पाहिजे या साठी हा भव्य राज्य स्तरीय मेळावा योजला आहे. दि. 31/10/2021 रोजी वार रविवार या दिवशी सकाळी 10 वाजता, अग्रसेन भवन सिडको औरंगाबाद. येथे राज्य स्तरीय महामेळावा आयोजीत केलेला आहे, कोरोना नियमावली चे पालन करत मोठ्या संख्येने उपस्थिति दर्शवून हा मेळावा यशस्वी करूया, असे आवाहन महिला जिल्हा अध्यक्ष ज्योती संतोष शर्माऔरंगाबाद कमलाकर पांगारकर, विभागीय संघटक सुभाष पोखरकर, नारायण होन, संपत समिदर आदिनी केले आहे.

Related Articles

Back to top button