अहमदनगर

यंदा मुळा धरण जुलै महिन्यातच भरणार का ? चर्चांना उधाण

राहुरी | अशोक मंडलिक : गेल्या पाच वर्षांत जुलैच्या पहिल्याच आठवड्यात मुळा धरणात नव्याने पाणी दाखल झालेले आहे, तुलनेने धरण जुलै महिन्यातच निम्मे भरलेले असल्याने यंदाच्या वर्षी धरण जुलैमध्येच भरणार की काय ? याची चर्चा मुळा लाभक्षेत्रात सुरू झाली आहे.

नगर जिल्ह्याला जलसंजीवनी ठरलेल्या मुळा धरणाच्या पाण्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते. बीपर जॉय चक्रीवादळाने पावसाचे गणित महिनाभर उशिरा बदलले असले तरी घाट माथ्यावर व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र पावसाची दमदार हजेरी यावेळी दिसून आली. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसाने अंबित, पिंपळगाव खांड ही धरणे तुडुंब भरली आणि मुळा धरणाकडे पाण्याची पहिली आवक ३ जुलै २०२३ ला सुरू झाली.

गेल्या पाच वर्षात ४ जुलै २०१८, ८ जुलै २०१९, ८ जुलै २०२०, ९ जुलै २०२२ ला नव्याने पाणी दाखल झालेले आहे. आता ३ जुलै २०२३ ला नव्याने पाणी दाखल झाले आहे. मागील दोन वर्षे धरण जुलै महिन्यातच निम्मे भरलेले आहे. आताची पावसाची परिस्थिती पाहता याच महिन्यात धरण निम्मे भरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या दहा वर्षात जुलैमध्ये सहा वेळा तर ऑगस्ट महिन्यात चार वेळा धरण निम्मे भरलेले आहे. त्यामुळे मुळा धरणाच्या लाभक्षेत्रात अशा पल्लवीत झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button