अहमदनगर

स्वांतत्र्य दिनानिमित्त गोटुंबे आखाडा येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

पत्रकार संघाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य करणार : आर.आर.जाधव

राहुरी : तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे आज 15 ऑगस्ट स्वांतत्र्य दिनाचे औचित्य साधून युवा ग्रामीण पत्रकार संघटना व दिशा शक्ती मीडिया समूहाच्या वतीने शाळेतील 2023 -24 या शैक्षणीक वर्षातील इयत्ता 1 ली ते 7 वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन प्रोत्साहन मिळवण्यासाठी ट्रॉफी, मेडल व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते मधुकर साळवे हे होते तर कार्यक्रमासाठी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हा सचिव राजेंद्र म्हसे, राहुरी तालुकाध्यक्ष अशोक मंडलिक, सचिव आर.आर.जाधव, सह संघटक रमेश खेमनर, सदस्य प्रमोद डफळ, नाना जोशी, उमेश बाचकर, कृष्णा गायकवाड, मनोज हासे, राहुरी फोटोग्राफर संघटना अध्यक्ष जालिंदर गडधे, अंकुश दवणे, सचिन सोळसे, किरण खेमनर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब दाभाडे, प्रहारचे दत्तात्रय खेमनर, मुकींदा शिंदे, राहुरी खुर्द ग्रामपंचायतचे उपसरपंच तुकाराम बाचकर, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी पवार, मीनाक्षी घोकसे, मनीषा शेंडे, प्राजक्ता शेटे, अंगणवाडी सेविका यांच्यासह पालकवर्ग व मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे सचिव आर.आर.जाधव यांनी केले व सूत्र संचलन श्रीमती अनिता मोरे यांनी तर आभार श्रीमती राणीताई साळवे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेच्या मुख्यध्यापिका जपकर मॅडम, कल्हापुरे मॅडम, निमसे मॅडम, कमळापूर मॅडम, मोरे मॅडम, साळवे मॅडम, कांबळे मॅडम व दुधाडे मॅडम या महिला शिक्षकांनी अथक परीश्रम घेतले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button