धार्मिक

पवित्र मारियाच्या सहवासाने दु:ख विसरून खरा आनंद व आशीर्वाद – फा.विक्रम शिनगारे

हरेगाव मतमाउली यात्रापूर्व चौथा नोव्हेना शनिवार संपन्न

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : आजचा विषय आहे आरोग्यदायीनी पवित्र मरिया. पवित्र मरिया मानवी जीवनातील पपांच्या गाठ सोडवीत असते. हे शब्द आहेत पोप फ्रान्सिस यांचे, आपल्या प्रत्येकाच्या जीवनात अनेक वेळा मारिया मातेने आपल्याला दर्शन दिलेले आहे. आशीर्वाद दिलेला आहे. तिच्या मध्यस्थीव्दारे आपली प्रभूमध्ये श्रद्धा व विश्वास वाढलेला आहे. आपल्याकडे अनेक असे या मातेचे अनुभव आहेत. आपल्याप्रमाणेच पोप फ्रान्सिस यांच्या जीवनात सुद्धा आपल्या आईने त्यांना स्पर्श केला आहे. त्या सर्व अनुभवाचे संकलन पुस्तकात केले आहे. पुस्तकाचे नाव आहे शी इज माय मदर” म्हणजेच ती माझी आई आहे. ती माता फक्त येशूची आई नव्हे तर ती आपणा सर्वांची आई आहे, असे म्हणतात. आ म्हणजे आत्मा व इ म्हणजे ईश्वर. मारिया माता ही ईश्वराची आत्मा आहे. ती सदा सर्वकाळ आपल्या बरोबर राहते. आपल्यासाठी प्रभू परमेश्वराकडे प्रार्थ करीत असते. प्रत्येक धर्मगुरू व धर्मभगिनीच्या जीवनात मरिया मातेला विशेष असे स्थान आहे. ज्यावेळी आम्ही आजारी असतो, संकटात असतो, निराश असतो. आईवडिलांची व नातेवाईकांची जी आठवण येते. एकटेपणा वाटतो, त्या त्या वेळेस मरिया माता आमची आई आमचा सर्वांचा सांभाळ करते. मारिया माता आमच्या पाठीशी सदैव उभी असते.

आज आपण आईच्या प्रेमापोटी इथे मरिया मातेचे दर्शन घेण्यासाठी आलो आहोत. आपल्या कुटुंबातील ज्या समस्या आहेत, त्या सोडविण्यासाठी येथे आलो आहोत. प.मारिया आपल्या सोबत प्रवास करीत असते. आपण नोव्हेनात सहभागी होतो, पदयात्रा काढतो. उपवास करतो मेणबत्त्या फुले अर्पण करतो, दर्शन घेतो. या तीर्थक्षेत्रांमध्ये आपले सर्व दु:ख विसरून तिच्या सहवासात आपण राहतो. तोच खरा आनंद व आशीर्वाद, मारिया माता ही आरोग्यदायीनी माता आहे. तिचे प्रेम आपल्यावर आहे आणि म्हणूनच या मरिया मातेच्या डोंगरावर अनेकांना चांगले आरोग्य मिळाले आहे. मारिया माता जरी स्वर्गात आहे, तरीही आपली आई मानवी जीवनाच्या गाठी सोडवीत असते. हे शब्द आहेत. असे प्रतिपादन मतमाउली यात्रापूर्व चौथ्या शनिवारी नोव्हेना प्रसंगी फा.विक्रम शिणगारे यांनी केले व प.मिस्सा प्रसंगी फा.संजय पठारे यांनी प्रवचन केले.

यावेळी हरेगाव प्रमुख धर्मगुरू फा.डॉमनिक रोझारिओ, फा.फ्रान्सिस ओहोळ, प्रकाश भालेराव, पीटर डिसोझा, आल्विन मिस्किटा, अनिल चक्रनारायण आदी लोयोला सदन, श्रीरामपूर व फ्रान्सिस झेवियर चर्च टिळकनगर येथील धर्मगुरू सहभागी होते. येत्या पाचव्या शनिवारी ३ऑगस्ट रोजी प.मारिया युवकांचा आदर्श या विषयावर स्नेहसदन चर्च राहुरी, संत जोसेफ चर्च केंदळ, फातिमा माता चर्च राहुरी येथील धर्मगुरू प्रवचन व मिस्सा करतील. तरी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्रमुख धर्मगुरु फा.डॉमनिक रोझारिओ, व सर्व धर्मगुरू, धर्मभगिनी ग्रामस्थ हरेगाव उंदीरगाव यांनी केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button