बांधकाम कामगार नोंदणीसाठी अधिकाऱ्यांकडून होणारी अडवणूक सहन करणार नाही – प्रशांत लोखंडे
राहुरी – राहुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री.शिंदे यांच्या दालनात माजी खासदार सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव शिवसेनेचे युवा नेते प्रशांत लोखंडे यांनी अचानक भेट देत बांधकाम कामगार नोंदणीसाठी शासकीय अधिकाऱ्यांकडून होत असलेली अडवणुकीवरून आक्रमक होत खडे बोल सुनावले.
या प्रसंगी शिवसेना राहुरी तालुका प्रमुख देवेंद्र लांबे, युवासेनेचे शुभम वाघ, वैद्यकीय मदत कक्षाचे प्र.अशोक साळुंके, तालुका संपर्कप्रमुख अशोक तनपुरे, संघटक महेंद्र उगले, उपतालुका प्रमुख सुनील खपके आदी उपस्थित होते. यावेळी प्रशांत लोखंडे यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे ग्रामसेवक यांच्या कामाविषयी नाराजी व्यक्त केली. ग्रामसेवक मजूर असल्याचा दाखला देण्यास टाळाटाळ करतात. खाजगी अभियंत्यांनी बांधकाम मजूर असल्याचा दाखला दिल्यास त्यांना कामगार आयुक्तांकडून पत्रव्यवहार करत किचकट दस्तावेजाची मागणी केली जाते. फुटकळ स्वरूपाचे काम करणारे अभियंता व ठेकेदार मागणी केलेले दस्तावेज उपलब्ध करून देवू शकत नाहीत.
त्यामुळे महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांसाठी राबविलेली उत्कृष्ट योजनेचा लाभ शेवटच्या घटकाला मिळत नाही. या प्रकरणाची गटविकास अधिकाऱ्यांनी दखल घेवून उचित कार्यवाही करावी असे श्री.लोखंडे यांनी म्हटले आहे.
बांधकाम कामगार नोंदणी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी शासनाच्या या योजनेचा लाभ मिळावा व बांधकाम कामगारांची अडवणूक न करता आलेली प्रकरणे मंजूर करावीत. शासकीय कामात हलगर्जीपणा केल्यास शिवसेना स्टाईलने शिवसैनिक उत्तर देतील. बांधकाम कामगारांना अडचण आल्यास राहुरी येथील शिवसेना कार्यालयास संपर्क साधावा.
_ देवेंद्र लांबे, शिवसेना राहुरी तालुका प्रमुख.
या प्रसंगी बांधकाम कामगार प्रतिनिधी सुरेश होन, विशाल खपके, सतीश पांडागळे, गोकुळ होन, गणेश खपके, सुनील खपके, गेनुदास होन, सुभाष होन, जालिंदर काळे, प्रवीण भोसले, रवींद्र म्हस्लूद, पांडुरंग गडकर,सोमनाथ जऱ्हाड आदी उपस्थित होते.