धार्मिक

९ व १० सप्टेंबर रोजी अमृत महोत्सवी मतमाउली यात्रा महोत्सव

३० ऑगस्ट रोजी महागुरूस्वामी यांच्या हस्ते ध्वजारोहण व यात्रा शुभारंभ  

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील संत तेरेजा चर्च हरेगाव येथील मतमाउली भक्तिस्थान येथे सालाबादप्रमाणे व यावर्षी ९ व १० सप्टेंबर रोजी मतमाउली यात्रेचा ७५ वा अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार असल्याने त्या दृष्टीने जय्यत तयारी सुरु झाली आहे.

सध्या यात्रेपूर्वी दर शनिवारी नोव्हेना [भक्ती] विविध धर्मगुरू यांच्या प्रवचनाने होत आहे. त्यानंतर ३० ऑगस्ट रोजी नासिक धर्मप्रांत महागुरुस्वामी रा रे डॉ.लूरडस डांनियल यांच्या हस्ते ध्वजारोहण व शुभारंभ व “पवित्र मारिया आदर्श सहप्रवासी माता”या विषयावर प्रवचन, दि ३१ ऑगस्ट फा. संदीप जगताप यांचे पवित्र मारिया पावित्र्याचा आदर्श”या विषयावर प्रवचन, १ सप्टेंबर फा. नेल्सन परेरा-“पवित्र मारिया : नवीन कराराचा कोश”२ सप्टेंबर फा.संदीप कोशाव-“पवित्र मारिया आणि दैवी पाचारण”, दि ३ फा.विशाल त्रिभुवन-“पवित्र मारिया ख्रिस्ताची परिपूर्ण शिष्या”,

दि.४ फा.एरल फर्नांडीस नासिक-“पवित्र मारिया नितीमत्वासाठी छळ सहन करणाऱ्यांची सहाय्यकारिणी”, दि ५ फा.प्रमोद बोधक-“पवित्र मारिया ख्रिस्तसभेतील एकात्मता”, दि ६ महागुरुस्वामी रा रे डॉ एडविन कोलासो-“पवित्र मारिया ख्रिस्तसभेतील सक्रीय सहभागिता”, दि ७ फा.अंतोन डिसोझा-“पवित्र मारिया ख्रिस्तसभेतील प्रेषितीय कार्य”, दि ८ फा,जेरोल्ड रिबेलो-“पवित्र मारिया नम्रतेचा परमोच्च आदर्श”,

दि ९ सप्टेंबर शनिवार रोजी यात्रा महोत्सवदिनी सकाळी मिस्सा, सकाळी ८.३० वाजता पवित्र जपमाळ व नोव्हेना व विधिवत स्थानिक धर्मगुरू यांच्या हस्ते मतमाउली मूर्तीवर मुकुट चढविण्यात येईल व भाविकांना दर्शन रांगेचा शुभारंभ होईल. तासातासाला विविध धर्मगुरू यांचे मिस्सा बलिदान, सायंकाळी ४.३० वाजता प्रमुख याजक मुंबई सरधर्मप्रांत कार्डिनल ऑझवर्ल्ड ग्रेशियस यांचे “पवित्र मारिया विश्वाची राणी” या विषयावर महागुरुस्वामी नासिक लूरडस डानियल यांच्या उपस्थितीत असंख्य भाविकांसमोर प्रवचन होणार आहे.

रविवारी १० सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता फा. पीटर डिसोझा यांचे पवित्र मिसा बलिदान असे यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती हरेगाव प्रमुख धर्मगुरू डॉमनिक रोझारीओ यांनी दिली. या अमृत महोत्सवास सर्व भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन फा.डॉमनिक, सचिन, रिचर्ड, व सर्व धर्मभगिनी, चर्च संलग्न संघटना, हरेगाव व उंदिरगाव ग्रामस्थ यांनी केले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button