अहमदनगर

वावरथ ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. प्रतिभा बाचकर या राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित

राहुरी | रमेश खेमनर : तालुक्यातील वावरथ येथील सरपंच प्रतिभा ज्ञानेश्वर बाचकर यांना सोमवार दि.13 फेब्रूवारी रोजी अहमदनगर येथील माऊली संकुल सभागृहात राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पदक असे या पुरस्काराचे स्वरूप होते. सरपंच संघटित चळवळीचे नेते बाबासाहेब पावसे यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सरपंच सेवा संघाच्या वतीने मान नेतृत्वाचा, सन्मान कर्तृत्वाचा हे ब्रीद वाक्याला अनुसरून महाराष्ट्रातील कर्तृत्ववान सरपंचाचा राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार देऊन गौरव केला जातो. यावेळी महाराष्ट्रातील निवडक सरपंच मध्ये ग्रामपंचायत हद्दीत विविध विकास कामे करून, शासनाच्या अनेक योजनाची अंमलबजावणी करून, अनुसूचित जाती जमातींसह इतर बांधवाना अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून, सांस्कृतिक, सामाजिक व क्रीडा स्पर्धांना प्रोत्साहन देणे व इतर विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनिय काम करणाऱ्या राहुरी तालुक्यातील वावरथ येथील सरपंच प्रतिभा ज्ञानेश्वर बाचकर यांची आदर्श सरपंच म्हणून निवड करण्यात आली होती.
यावेळी सरपंच सेवा संघाचे निलेश पावसे, अमोल शेवाळे, रवींद्र पावसे, रोहित पवार, देवीदास फापाळे सह वावरथ गावचे माजी पोलीस पाटील हरिभाऊ जाधव, ह.भ.प. बाळूमामा मधे, गोपीनाथ दुधाडे, मिनीनाथ जाधव, रवींद्र शेलार इत्यादी उपस्थित होते. तसेच या पुरस्काराचे श्रेय वावरथ ग्रामपंचायतचे उपसरपंच गंगाराम दुधवडे, ग्रामसेवक योगेश चंद, सदस्य धोंडीभाऊ बाचकर, रावसाहेब केदार, भागवत पवार, भिमराज जाधव, आपासाहेब बाचकर, गणेश बाचकर, सकाराम जाधव, पती ज्ञानेश्वर बाचकर तसेच सर्व ज्ञात अज्ञात ग्रामस्थांच्या सहकार्याने मिळाल्याचे प्रतिपादन सरपंच प्रतिभा बाचकर यांनी केले. सरपंच प्रतिभा ज्ञानेश्वर बाचकर यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार मिळाल्याबद्दल राजकीय, सामाजिक व ग्रामस्थांसह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Back to top button