अहमदनगर

कृषि सहाय्यक सौ. तांबे यांना जागर स्री शक्तीचा सन्मान कर्तुत्वाचा नवदुर्गा 2022 चा पुरस्कार प्रदान

राहुरी : येथील रहिवासी व येवला तालुक्यात कृषि विभागात कृषि सहाय्यक या पदावर कार्यरत असलेल्या सौ.सविता आण्णासाहेब पिसाळ (तांबे) यांना जागर स्री शक्तीचा सन्मान कर्तुत्वाचा पुरस्कार स्टार 24 फास्ट न्यूजच्या माध्यमातून प्रदान करण्यात आला आहे.
त्यांच्या कृषि क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून त्यांनी हा पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर या पुरस्काराचे श्रेय त्यांच्या कुटुंबीयांना दिले आहे. त्यांचे पती आण्णासाहेब गेणू पिसाळ हे नाशिक जिल्ह्यात आरोग्य विभागात शासकीय सेवेत कार्यरत असून त्यांंचे सौ.सविता पिसाळ यांना नेहमीच मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याने त्या आज कृषि सहाय्यक पदावर कार्यरत आहे.
कृषि क्षेत्रात आपले उल्लेखनिय कार्य पार पाडत असून त्यांच्या या कार्यामुळे स्टार 24 फास्ट न्यूजच्या संपादीका सुनीता राजेंद्र पाटील व नाशिक येथील राष्ट्रपती पदक विजेते पोलीस अधिकारी एम.टी.गायकर, राष्ट्रवादीचे भिसे व राजेंद्र पाटील व कलर्स टीव्ही मधील मालिकेतील कलाकार पल्लवी पटवर्धन मॅडम यांच्या प्रमूख उपस्थितीत कृषि सहाय्यक सौ.सविता पिसाळ यांना जागर स्री शक्तीचा सन्मान कर्तुत्वाचा या वर्षीचा 2022 पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Related Articles

Back to top button