भटारकरवस्ती जि.प. शाळेच्या चिमुकल्यांची अनोखी दिंडी

राहुरी / बाळकृष्ण भोसले - 'ज्ञानोबा माऊली तुकाराम, विठ्ठल, विठ्ठल, विठुरायाचा जयघोष सोबतीला हातात विविध प्रकारचे वृक्ष, फलक व स्वच्छता कलश तसेच  पावसाच्या हलक्या फुलक्या वातावरणात तालुक्यातील चिंचोली येथील भटारकरवस्ती जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांनी आषाढी एकादशीचे औचित्य साधत अनोखी दिंडी काढत ग्रामस्थांचे लक्ष वेधले. चिमुकल्यांच्या या दिंडीतून मानवाने लक्ष देण्याच्या सद्यस्थितीचे दर्शन घडविणार्या संदेशाचे जनमाणसातून कौतुक होत आहे.
व्हिडिओ पहा:-

आषाढी एकादशी निमित्ताने यंदा कोरोना महामारीचे  संकट जरासे कमी झाल्याने राज्यभरात आनंद व उत्साहाचे वातावरण आहे. गत दोन वर्षाच्या प्रदिर्घ विश्रांतीनंतर विठुरायाच्या ओढीने वारकरी आसुसले होते. हे संकट काही प्रमाणात कमी झाल्याने गावोगावच्या दिंड्यांनी यंदा मोठ्या प्रमाणावर पंढरपूरला प्रस्थान ठेवले आहे. 

या रस्यावरील दररोजच्या दृष्टीस पडणार्या दिंड्यांनी चिमुकल्यांनाही मोठे कुतूहल लागले होते. त्यानुषंगाने प्रत्यक्ष दिंडीचा अनुभव घेण्यासाठी अनेक शाळांमधून प्रत्यक्ष दिंड्याचे आयोजन शिक्षकांकडून केले जाते. त्या पार्श्वभूमीवर भटारकरवस्ती शाळेतील शिक्षकांनी स्थानिक ह.भ.प. श्रीकांत महाराज गागरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांना याची देही याची डोळा प्रत्यक्ष दिंडीची अनुभूती देण्यासाठी चिमुकल्यांची दिंडी काढली. या दिंडीतून माञ त्यांनी वर्तमान परिस्थितीवरील पर्यावरण, स्वच्छता, प्रदुषण या बरोबरच मानवी जीवनाशी निगडित ज्वलंत प्रश्न  जनमाणसांसमोर मांडत मानवाचं प्रबोधन व्हावं व निसर्गाप्रती सजग राहण्यासाठीचे विषय दिंडीतून हाती घेतले. चिमुकल्यांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपापली भुमिका यशस्वीपणे पार पाडली. बालवयात त्यांना मिळत असलेल्या या मानवी जीवनाशी निगडित प्रश्नाने प्रबोधन होवून एक तरी झाड असावे. परसदारी चा आगळावेगळा संदेश दिला. या उपक्रमाचे जनतेतून भरभरून कौतुक होत आहे.

या दिंडीत भटारकरवस्ती शाळेतील सर्व महिला पुरूष शिक्षकांसह केंद्रप्रमुख ठोंबरे मॅडम, दत्ता पारखे, वाल्मिक हारदे, उपसरपंच विलास लाटे, दत्तात्रय नलगे, मुरलीधर हारदे आदींसह स्थानिक भजनी मंडळ व ग्रामस्थांनी सहभाग नोंदविला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या